Maharashtrachi Hasyajatra: संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारी "कोहली फॅमिली"; प्रसादनं सांगितला अवली, पावली, शिवाली आणि बिवाली या कॅरेक्टर्सचा किस्सा
Maharashtrachi Hasyajatra: कोहली फॅमिलीच्या स्टिकची आयडीया कोणाला आली? या स्किटमधील कॅरेक्टर्सचा लूक, या सर्व गोष्टींबाबत अभिनेता प्रसाद खांडेकरनं (Prasad Khandekar) सांगितलं आहे.
Maharashtrachi Hasyajatra: छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या कार्यक्रमामधील शिवाली आवली कोहली, बिवाली आवली कोहली, पावली आवली कोहली,आवली लवली कोहली या कोहली फॅमिलीनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे. कोहली फॅमिलीच्या स्किटला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या फॅमिलीच्या स्टिकची आयडीया कोणाला आली? या स्किटमधील कॅरेक्टर्सचा लूक या सर्व गोष्टींबाबत अभिनेता प्रसाद खांडेकरनं (Prasad Khandekar) सांगितलं आहे.
अशी तयार झाली कोहली फॅमिली
प्रसाद खांडेकरनं मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कोहली फॅमिलीच्या स्किटबद्दल सांगितलं तो म्हणाला, "शिवाली आणि भिवाली या जुळल्या बहिनींचे कारेक्टर्स आधीपासूनच प्रियदर्शनी आणि शिवाली करत होत्या. एकदा रायटर मिटिंगला मोटे सरांना सुचलं की, आपण शिवाली आणि भिवालीच्या आई-वडिलांना दाखवूयात. मिटिंगमध्ये आम्ही बोलत होतं, तेव्हाच आम्हाला कॅरेक्टर्सची नावं सुचली. कोहली फॅमिलीचं पहिलं स्किट समीर दादानं लिहिलं होतं."
पुढे प्रसाद म्हणाला, 'जेव्हा आम्ही स्किटची रिहर्सल करत होतो, तेव्हा मला एक सूर सापडला. मग तो सूर आम्ही गोस्वामी सरांना ऐकवल्यानंतर त्यांनाही आवडलं. स्किट सुरु होण्याच्या आधी आर्धा तास गोस्वामी सरांनी मला बोलवून घेतलं. ते म्हणाले पशा तू पण वीग घाल. त्यानंतर स्किट सादर करायच्या आधी आर्धातासात त्यांनी माझा लूक क्रिएट केला.'
कोहली फॅमिलीमधील सदस्यांची भूमिका प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर हे साकारतात. समीर चौघुले देखील या स्किटमध्ये काम करतो. कोहली फॅमिलीच्या डायलॉग्सचं एक गाणं देखील तयार करण्यात आलं होतं. हे गाणं सोशल माडियावर व्हायरल झालं.
View this post on Instagram
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातील समीर चौघुले , नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सूत्रसंचालन प्राजक्ता माळी करते. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक हे या शोचे परीक्षक आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :