(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navin Prabhakar : 'वायरल फ्रायडे' शो मधून मनोरंजनाची प्रेक्षकांना मेजवानी; स्टॅंडअप कॉमेडीयन नवीन प्रभाकर दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत
Navin Prabhakar : स्टॅंडअप कॉमेडीयन नवीन प्रभाकर सूत्रसंचालकाच्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
Navin Prabhakar : स्टँडअप कॉमेडीयन नवीन प्रभाकर हा त्याच्या 'पैचान कौन?' या प्रश्नामुळे फारंच लोकप्रिय झाला. नवीन आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, यावेळी तो स्टॅंडअप कॉमेडीयन म्हणून नाही तर सूत्रसंचालकाच्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नवीन प्रभाकर सूत्रसंचालन करत असलेल्या शोचे नाव 'वायरल फ्रायडे’ विथ नवीन प्रभाकर' (Viral Friday With Navin Prabhakar) असे आहे.
'वायरल फ्रायडे’ हा शो पूर्णपणे सिनेमाला वाहिलेला आहे. काही सिनेमे हे माइल स्टोन असतात. त्यामुळेच तर ते प्रेक्षकांच्या कायम स्मरणात असतात. 'वायरल फ्रायडे'मधून असेच मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिलेले सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत. नवीन प्रभाकर या शोच्या माध्यमातून संस्मरणीय सिनेमांच्या आठवणींची पोतडी त्याच्या अनोख्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. सिनेमातील काही गाजलेल्या डायलॉग्जची मिमिक्री, संस्मरणीय सिनेमातील लोकप्रिय कलाकारांना सिनेमा आणि त्यातील भूमिकेविषयीच्या आठवणींना उजाळा देत बोलतं करणं आणि शेवटी दैनंदिन घडामोडींवर भाष्य करणारी एखादी पाच मिनिटांची स्टँडअप कॉमेडी असं ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे.
या शोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री सारा श्रवण या शोची मुख्य निर्माती असून ती 'फर्स्ट रे स्टुडिओ'द्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. या आगळ्या-वेगळ्या शोची संकल्पना आणि दिग्दर्शन निलेश कुंजीर याचे असून ते या शोचे सहनिर्माते आहेत. 'वननेस फिल्म्स'बॅनरअंतर्गत त्याने शोची सहनिर्मिती केली आहे.
कार्यक्रमाविषयी नवीन प्रभाकर म्हणाला...
नवी भूमिका आणि कार्यक्रमाविषयी नवीन प्रभाकर सांगतो, "मराठी रंगभूमी आणि गाजलेल्या मराठी चित्रपटातील नामवंत कलाकार मंडळींना तर आपण सगळेच वेळोवेळी कोणत्या न कोणत्या टी.व्ही.चॅनलद्वारे पाहात आलो आहोत. पण, एखाद्या सिनेमातील छोट्याशा भूमिकेत असलेल्या पण त्या सिनेमासाठी अतिमहत्त्वाच्या कलाकाराबद्दल जे कुतूहल असतं ते मात्र आपण मिस आऊट करतो. एखाद्या कलाकाराचं नाटक किंवा सिनेमातील योगदानाबद्दलचे श्रेय हे शेवटपर्यंत कुणालाच कळत नाही. अशा कलाकारांना एकत्र आणून, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या त्या सिनेमाविषयीच्या आठवणी विशेष अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकणं हे किती विलक्षण असू शकतं? तर हेच 'वायरल फ्रायडे' मधून बघता येतील."
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या बातम्या :