Marathi Serial : टीआरपीच्या खेळात जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ठरली नंबर वन; जाणून घ्या TRP Report
Marathi Serial Trp Rating : मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते.
Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात गेल्या काही दिवसांत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते, लेखक, दिग्दर्शक मालिकेत सतत नव-नविन ट्विस्ट आणत असतात. याचाच परिणाम मालिकांच्या टीआरपी रेटिंगवर होत असतो. टीआरपी रिपोर्टमध्ये दर आढवड्याला चढ-उतार होत असतो. नुकत्याच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. जाणून घ्या या आठवड्याच्या टॉप 10 मालिका...
1. 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळालं आहे.
2. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.
3. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.5 रेटिंग मिळालं आहे.
4. 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.
5. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडली आहे. या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे.
6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे.
7. 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.2 रेटिंग मिळाले आहे.
8. टीआरपीच्या शर्यतीत 'स्वाभिमान' ही मालिका आठव्या स्थानावर आहे. या मालिकेला 4.8 रेटिंग मिळाले आहे.
9. 'अबोली' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत नवव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.5 रेटिंग मिळाले आहे.
10. टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर 'लग्नाची बेडी' ही मालिका आहे. या मालिकेला 3.9 रेटिंग मिळाले आहे.
'रंग माझा वेगळा'च्या महाएपिसोडला 5.5 रेटिंग
'रंग माझा वेगळा' ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आजही या मालिकेची क्रेझ कायम आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका चौथ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे. तर मालिकेच्या महाएपिसोडला 5.5 रेटिंग मिळाले आहे. तर दुसरीकडे 'पिंकिचा विजय असो' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सोळाव्या क्रमांवर आहे. या मालिकेला 3.0 रेटिंग मिळाले आहे. पण या मालिकेच्या महाएपिसोडला 4.2 रेटिंग मिळाले आहे.
संबंधित बातम्या