KBC 14 : 'या' प्रश्नामुळे हुकली बंगळुरुच्या अनु वर्गीस यांची 'करोडपती' होण्याची संधी! तुम्हाला उत्तर माहितीये का?
KBC 14 : अनु यांनी 75 लाखांचा टप्पा पार केला. पण एक कोटीच्या प्रश्नाचं उत्तर त्या देऊ शकल्या नाहीत.
KBC 14 : छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा असा शो आहे, ज्यामुळे लोकांना ज्ञान मिळते तसेच सर्वसामान्यांना करोडपती होण्याची संधीही मिळते. 2000 साली सुरू झालेल्या या शोमध्ये प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन आतापर्यंत अनेक स्पर्धक करोडपती झाले आहेत. प्रेक्षकांची या कार्यक्रमाला पसंती मिळाली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. या कार्यक्रमाचा सध्या 14वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सीझनच्या एका एपिसोडमध्ये बंगळुरुमधील अनु वर्गीस यांनी सहभाग घेतला होता. अनु यांनी 75 लाखांचा टप्पा पार केला. पण एक कोटीच्या प्रश्नाचं उत्तर त्या देऊ शकल्या नाहीत. हा प्रश्न कोणता होता, ते जाणून घेऊयात...
अनु या स्किन स्पेशलिस्ट आहेत. बंगळुरु येथे राहणाऱ्या अनु यांनी 75 लाख जिंकले.पण कन्फ्युजनमुळे अनु या एक कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही. प्रश्न असा होता की, '26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जारी केलेल्या टपाल तिकिटात यापैकी कोणत्या ओळी कोरल्या गेल्या होत्या?' या प्रश्नासाठी चार पर्याय देखील देण्यात आले होते. सारे जहां से अच्छा, रघुपती राघव राजा राम, जन गण मन वंदे मातरम् हे चार ऑप्शन्स देण्यात आले होते. या प्रश्नाचं उत्तर रघुपती राघव राजा राम हे होते.
View this post on Instagram
या प्रश्नाचे उत्तर अनु यांना माहित होते, पण त्या थोड्या गोंधळल्या. त्यांना वाटलं, एवढं मोठं नाव तिकिटावर कसं येणार. त्यांनी दुसरा पर्याय म्हणजे रघुपती राघव राजा राम लॉक करण्याचा विचार केला, पण त्यांनी वंदे मातरम् या चौथ्या पर्यायाला निवडण्याचा विचार केला. हे उत्तर चुकीचे असल्याने त्या करोडपती होऊ शकल्या नाही. मात्र, ती 75 लाख रुपये त्यांनी जिंकले.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: