एक्स्प्लोर

Sai Tamhankar : मराठमोळ्या सईला मिळाली 'ब्लॅक लेडी'; आयफानंतर आता फिल्मफेअर पटकावला

फिल्मेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार सईला मिळाला आहे.सईनं या सोहळ्याला हटके लूकमध्ये हजेरी लावली होती. 

Sai Tamhankar : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हाणकरनं (Sai Tamhankar) बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. सईनं 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या मिमी या हिंदी चित्रपटामध्ये शमा ही भूमिका साकारली. सईच्या या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनेक कलाकारांनी सईच्या अभिनयाचं कौतुक केलं. सईला मिमी या चित्रपटासाठी आयफा हा पुरस्कार देखील मिळाला. तर आता सईला. फिल्मेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सईनं या सोहळ्याला हटके लूकमध्ये हजेरी लावली होती. 

 मंगळवारी (30 ऑगस्ट) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 67 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 चे (FilmFare Award Winners) आयोजन करण्यात आले होते. यंदाचा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सिद्धार्थ मल्होत्राच्या शेरशाह या चित्रपटाला मिळाला आहे. तर मिमी या चित्रपटासाठी  क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सईला मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. गोल्डन आणि ब्लॅक कलरचा स्किन फिट ड्रेस आणि हटके हेअर स्टाईल अशा लूकमध्ये सईनं फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. सईनं फिल्मफेअरच्या ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोला अनेक कलाकारांनी कमेंट करुन सईला शुभेच्छा दिल्या. जितेंद्र जोशी, अमेय वाघ, स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रिया बापट या कलाकांनी सईच्या पोस्टला कमेंट केली आहे. 

पाहा सईची पोस्ट:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai (@saietamhankar)

मिमी या चित्रपटामध्ये सईसोबतच पंकज त्रिपाठी, मनोज पाहवा, सुप्रिया पाठक या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.  लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Filmfare Awards 2022 : बेस्ट फिल्म शेरशाह, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिती सेनन; जाणून घ्या 67 व्या फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget