Rishi Singh : 'Indian Idol 13' चं विजेतेपद पटकावल्यानंतर ऋषी सिंहने व्यक्त केली इच्छा; म्हणाला, 'मला नेहा कक्करसारखं...'
Indian Idol 13 : 'इंडियन आयडॉल 13' या लोकप्रिय कार्यक्रमाचा विजेता ऋषी सिंह (Rishi Singh) ठरला आहे.
Indian Idol 13 Winner Rishi Singh Wish : अयोध्येचा ऋषी सिंह (Rishi Singh) 'इंडियन आयडॉल 13'चा (Indian Idol 13) विजेता ठरला आहे. विजेतेपदानंतर ऋषीने एक इच्छा व्यक्त केली आहे. तो म्हणाला,"इंडियन आयडॉल 13'चा विजेता म्हणून माझं नाव घोषित झालं तेव्हा मला अश्रू अनावर झाले होते. या पर्वात तगडे स्पर्धक होते. पण मेहनतीच्या जोरावर मी या पर्वाचा विजेता ठरलो आहे".
विजेतेपद पटकावल्यानंतर एका मुलाखतीत ऋषी सिंह म्हणाला,"इंडियन आयडॉल 13'मध्ये सहभागी होतानाच या पर्वाचा विजेता होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. या कार्यक्रमाने मला नवी ओळख दिली आहे. माझ्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. या पर्वातील सर्वच स्पर्धक एका पेक्षा एक होते. पण या सर्वांना मागे टाकत अखेर मी या पर्वाचा विजेता झालो".
'इंडियन आयडॉल 13'चा विजेता झाल्यानंतर ऋषी सिंह काय करणार?
'इंडियन आयडॉल 13'चा विजेता झाल्यानंतर ऋषी सिंह आता आंतरराष्ट्रीय प्रवास करणार आहे. 'इंडियन आयडॉल 13'च्या ट्रॉफीसह ऋषीला 25 लाख रुपये मिळाले आहेत. आता या पैशातून तो संगीतक्षेत्रात काही नवे प्रयोग करणार आहे. तसेच 'इंडियन आयडॉल 13'च्या मंचावर आता मला परीक्षक म्हणून यायचं आहे. विजेतेपदानंतर मला अनेक चांगल्या ऑफर मिळत आहेत".
View this post on Instagram
'इंडियन आयडॉल 13'ची परीक्षक नेहा कक्करदेखील स्पर्धक म्हणून कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्याचप्रमाणे ऋषीदेखील स्पर्धक म्हणून सहभागी झाला असून आता त्याला परीक्षक म्हणून या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. तसेच ऋषी अरिजीत सिंहचा मोठा चाहता असून आता त्याने अरिजीतला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ऋषी सिंहचं आयुष्य खूपच फिल्मी आहे. त्याला दत्तक घेण्यात आलं होतं. ऋषी सिंह 'इंडियन आयडॉल 13'चा विजेता झाल्यानंतर दत्तक मुलाने आयुष्याचं सोनं केलं, अशी प्रतिक्रिया त्याच्या पालकांनी दिली. तो अयोध्येचा असून सध्या तो डेहराडूनमधील हिमगिरी या विद्यापीठात शिक्षण घेत आहे.
ऋषी सिंह विजेता झाला असला तर देबिस्मिताने दुसरा आणि चिरागने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांना ट्रॉफीसह पाच लाख रुपयांचा चेक मिळाला आहे.
संबंधित बातम्या