Indian Idol 13 Promo : 'इंडियन आयडॉलचा 13' लवकरच होणार सुरू; प्रोमो आऊट
Indian Idol 13 : 'इंडियन आयडॉलचा 13' वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Indian Idol 13 Latest Promo : इंडियन आयडॉल (Indian Idol) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. 'इंडियन आयडॉल 12' यशस्वी झाल्यानंतर आता 'इंडियन आयडॉल 13' (Indian Idol 13) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणाऱ्या या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला आहे.
'इंडियन आयडॉल' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांना त्यांचं टॅलेंट जगाला दाखवण्याची संधी मिळते. नुकताच 'इंडियन आयडॉल 13'चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'फिर से साथ आने का बहाना है, अब मौसम म्यूजिकाना है' असं म्हणत या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. प्रोमो आऊट झालेला असला तरी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हे अद्याप समोर आलेलं नाही.
View this post on Instagram
'इंडियन आयडॉल 13'चा प्रोमो आऊट झाल्यामुळे प्रेक्षक आता या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांना या कार्यक्रमाची उत्सुकता आहे. तर काही जण नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. "नाटकाचं दुकान परत सुरू होत आहे. स्क्रिप्टेड कार्यक्रम, सगळं फेक आहे, अशा अनेक कमेंट्स नेटकरी करत आहेत".
'इंडियन आयडॉल 12' या कार्यक्रमाची नेहा कक्कड(Neha Kakkar), विशाल ददलानी (Vishal Dadlani) आणि हिमेश रेशमियाने (Himesh Reshammiya) सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे. या कार्यक्रमामुळे नेहा कक्करला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
Indian Idol : इंडियन आयडॉलमध्ये सहभागी व्हायचंय? 'या' दिवशी मुंबईत होणार ऑडिशन्स
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)