Indian Idol : इंडियन आयडॉलमध्ये सहभागी व्हायचंय? 'या' दिवशी मुंबईत होणार ऑडिशन्स
2004 मध्ये सुरू झालेल्या इंडियन आयडॉल (Indian Idol) या कार्यक्रमानं अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली.
Indian Idol : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल (Indian Idol) हा भारतीय टेलिव्हिजनवरील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि लोकप्रिय गायन रियालिटी शो आहे. या कार्यक्रमाने अनेक होतकरू गायकांना राष्ट्रीय मंचावर गाण्याची संधी देऊन त्यांची स्वप्नं पूर्ण केली आहेत. 2004 मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमानं देशाला सलमान अली (सत्र 10 चा विजेता), सनी हिंदुस्तानी (सत्र 11 चा विजेता) आणि अगदी अलीकडे पवनदीप राजन (सत्र 12 चा विजेता) यांसारखे अद्भुत आवाज दिले आहेत, ज्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांना वेड लावलं!
इंडियन आयडॉलचे ऑडिशन्स विविध शहरांमध्ये दिसू लागला आहे. यंदाच्या सिझनचे मुंबईतील ऑडिशन 24 जुलै रोजी नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर्स अमृत शक्ती कॉम्प्लेक्स, चांदिवली फार्म रोड, ऑफ साकी विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400072 येथे सकाळी 10.30 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. जयपूर, भुवनेश्वर, गुवाहाटी, पटणा, कोलकाता, इंदूर आणि लखनौनंतर या वाहिनीने देशातील आणखी काही शहरांमध्ये ऑडिशन्स घेण्याचे योजले आहे. चंदिगड, देहरादून आणि दिल्ली जवळ राहणार्या तरुण, उत्साही आणि प्रतिभावान गायकांना या तीन शहरांमध्ये होणार्या ऑडिशनसाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
View this post on Instagram
या ऑडिशन्सबद्दल बोलताना इंडियन आयडॉल 12 चा विजेता आणि एक अष्टपैलू गायक पवनदीप राजनला त्याचा स्वतःचा एक गायकापासून ते भारतात प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवण्यापर्यंतचा प्रवास आठवला. तो म्हणतो, “मला पहिल्यापासून गायक व्हायचे होते आणि मी अगदी 2 वर्षांचा असल्यापासून तबला वाजवत होतो. इंडियन आयडॉल या प्रतिष्ठित मंचाने माझे स्वप्न साकार केले. या शोमध्ये असताना मी संगीताबद्दल सगळं काही शिकलो. मला आठवतं आहे की, ऑडिशन दरम्यान माझ्या आधी सवाई भट्टने ऑडिशन दिली होती. असे छान छान गायक असताना मी इथवर पोहोचून शकेन असं मला वाटलंच नव्हतं. ऑडिशन फेरीपासून ते विजेता होईपर्यंत इंडियन आयडॉल या मंचाने मला नेहमीच सुखद धक्के दिले आहेत. आज मी जो कोणी आहे, त्याबद्दल मी या मंचाचे आभार मानावे तितके कमीच आहेत. मला एक गायक म्हणून ओळख मिळाली आहे आणि माझ्या कुटुंबाला खूप मान सन्मान मिळाला आहे. म्हणून मी मुंबईत 24 जुलै रोजी होणार्या ऑडिशनचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशी विनंती करतो, कारण यंदाचे दावेदार तुम्हीही असू शकता!”
हेही वाचा: