Devmanus 2 : अभिनेता नसता तर ‘देवमाणूस 2’ मालिकेतील 'हा' कलाकार झाला असता आयपीएस अधिकारी
Devmanus 2 : 'देवमाणूस' या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे.
Devmanus 2 : 'देवमाणूस' (Devmanus 2) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेनं प्रेक्षकांना चांगलचं खिळवून ठेवलं आहे. आता या मालिकेत ‘मार्तंड जामकर’ या नवीन पात्राची एण्ट्री झाली आहे. अभिनेते मिलिंद शिंदे हे पात्र साकारत आहेत. मिलिंद शिंदे जर अभिनेते नसते तर ते आयपीएस अधिकारी झाले असते.
'देवमाणूस' या मालिकेने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले आहे. या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच प्रेक्षकांना मालिकेत मार्तंड जामकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या एंट्रीतून एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. ही भूमिका अभिनेता मिलिंद शिंदे अगदी चोख बजावतो आहे. मार्तंड जामकर यांच्या एंट्रीनंतर मालिका एका अतिशय रंजक वळणावर आली आहे. मार्तंड अजितकुमारला कसा धडा शिकवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
आपल्या या वेगळ्या आणि दमदार भूमिकेबद्दल मिलींद शिंदे म्हणाला, 'मी एका चांगल्या भूमिकेची वाट बघत होतो. जास्तकरून खलनायक साकारल्यानंतर एक दमदार अशी भूमिका मार्तंड जामकरच्या रूपात माझ्या वाट्याला आली. एक इमानदार पोलीस अधिकारी ज्याच्यावर त्याच्या वरिष्ठांचा विश्वास आहे आणि तो कुठलीही केस तडीस नेतो अशी भूमिका मला देवमाणूस 2 या लोकप्रिय मालिकेत साकारायला मिळाली याचा मला आनंद आहे."
मिलिंद शिंदे यांच्यासाठी ही भूमिका का खास आहे याचं कारण सांगताना ते म्हणाले,"माझी आधी इच्छा होती की मी आयएएस किंवा आयपीएस अधिकारी व्हावं. जर मी अभिनेता नसतो झालो तर मी कदाचित आयएएस किंवा आयपीएस अधिकारी झालो असतो आणि तो अधिकारी हा मार्तंड सारखाच असता. मार्तंड जामकर प्रमाणेच इमानदार, तत्वांशी बांधील असणारा, गुन्हेगारांना अद्दल घडवणारा असाच अधिकारी मी झालो असतो."
'देवमाणूस' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर खिळवून ठेवलं. या मालिकेतील रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'देवमाणूस'मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली.
संबंधित बातम्या