एक्स्प्लोर

Devmanus 2 : दुसऱ्या सीझनमध्ये डिंपल-अजित कुमारचं लग्न होणार? ‘देवमाणूस 2’मध्ये येणार ट्विस्ट!

Devmanus 2 Update : ‘देवमाणूस’ या मालिकेच्या शेवटी डिंपल आणि अजितकुमार देव यांचं लग्न मध्यातच मोडलं होतं. पण, आता दुसऱ्या सीझनमध्ये पुन्हा एकदा या दोघांचं लग्न लागणार आहे.

Devmanus 2 Update : झी मराठीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. यापैकी एक मालिका म्हणजे देवमाणूस (Devmanus 2). या मालिकेच्या पहिल्या पर्वाने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. या मालिकेच्या शेवटच्या भागानंतर प्रेक्षक फार आतुरतेने दुसऱ्या भाग कधी येणार याची वाट पाहात होते. प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता अल्पावधीतच ‘देवमाणूस 2’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि मालिकेच्या या पर्वाने देखील प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे.

या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की, देवीसिंग हा नटवर बनून गावात आला होता. मात्र, आता त्याने पुन्हा एकदा आपला ‘डॉक्टर अजितकुमार देव’ हा मुखवटा परिधान केला आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेच्या शेवटी डिंपल आणि अजितकुमार देव यांचं लग्न मध्यातच मोडलं होतं. पण, आता दुसऱ्या सीझनमध्ये पुन्हा एकदा या दोघांचं लग्न लागणार आहे.

मालिकेत येणार मोठा ट्विस्ट!

यंदा डिंपल आणि अजितचं लग्न तर लागणार आहे, मात्र यावेळी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. डिंपलशी लग्न केल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी अजितचा मृत्यू होणार आहे. नव्या प्रोमोमध्ये हा थरार पाहायला मिळाला आहे. अनेकींना लग्नाची वचनं देऊन देवमाणूस अखेर डिंपलशी संसार थाटणार आहे. मात्र, काहीच क्षणानंतर डिंपल आणि अजित एका जंगलात जखमी अवस्थेत दिसतात. तर, अजितवर कुणीतरी गोळी झाडताना देखील दिसलं आहे. आता खरंच अजितचा अंत होणार की, ‘देवमाणूस’ पुन्हा नवी खेळी खेळणार, हे पाहणे अतिशय मनोरंजक ठरणार आहे.  

पाहा व्हिडीओ :

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. साताऱ्यातील लहानशा खेडेगावात लोकांची फसवणूक करणाऱ्या ‘डॉ. अजित कुमार देव’ उर्फ ‘देवी सिंग’ या बोगस डॉक्टरची ही कथा होती. अभिनेता किरण गायकवाड याने अजित कुमार देवची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Medha Manjrekar : महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 
Cricketer praises Maharashtrachi Hasyajatra: माजी क्रिकेटपटूनं केलं महाराष्ट्राची हास्यजत्रेचं भरभरून कौतूक; म्हणाले 'समीरदादाचं ते स्कीट..', VIDEO
माजी क्रिकेटपटूनं केलं महाराष्ट्राची हास्यजत्रेचं भरभरून कौतूक; म्हणाले 'समीरदादाचं ते स्कीट..', VIDEO
शिवीगाळ अन् वक्तव्यांनी खळबळ उडवली; सुनिता अहुजानं अचानक 'लॉक अप 2' सोडला अन् गोविंदाची एन्ट्री; सुनिताविषयी केले मोठे खुलासे..
शिवीगाळ अन् वक्तव्यांनी खळबळ उडवली; सुनिता अहुजानं अचानक 'लॉक अप 2' सोडला अन् गोविंदाची एन्ट्री; सुनिताविषयी केले मोठे खुलासे..

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
Embed widget