एक्स्प्लोर

Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’मध्ये होणार ‘या’ प्रसिद्ध खलनायकाची एण्ट्री, अजित कुमारसमोर उभं ठाकणार नवं आव्हान!

Devmanus 2 : या मालिकेत लवकरच ‘मार्तंड जामकर’ या नवीन पात्राची एण्ट्री होणार आहे. अजितकुमार आणि मार्तंड यांची जुगलबंदी प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार आहे.

Devmanus 2 : झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus 2) या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि या मालिकेच्या अफाट लोकप्रियतेमुळेच या मालिकेचं दुसरं पर्व देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या पर्वाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. नुकताच मालिकेत प्रेक्षकांनी अजित आणि डिम्पल यांचा लग्नसोहळा पाहिला. पहिल्या पर्वात अजितला पोलीस इन्स्पेक्टर दिव्या सिंग लग्नाच्या मंडपातून खेचून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच लवकरच प्रेक्षकांना मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

या मालिकेत लवकरच ‘मार्तंड जामकर’ या नवीन पात्राची एण्ट्री होणार आहे. अभिनेते मिलिंद शिंदे या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने मिलिंद शिंदे यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. त्यामुळे आता ‘देवमाणूस’ या मालिकेत एका रंजक वळणावर मिलिंद शिंदेची ‘मार्तंड जामकर’ ही भूमिका पाहणं औस्त्युक्याच ठरणार आहे.

मार्तंड जामकारमुळे अजितकुमारसमोर कुठलं नवीन आव्हान उभं राहणार? अजितकुमारचा चांगुलपणाचा मुखवटा फाटून त्याचा खरा चेहरा गावकऱ्यांसमोर येईल का? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना मिलिंद शिंदे म्हणाले की, ‘देवमाणूस ही मालिका खूपच लोकप्रिय आहे आणि या मालिकेतील अजित कुमारची व्यक्तिरेखा खूप दमदार आहे. या पर्वात मार्तंड जामकर ही महत्वपूर्ण भूमिका मी साकारतोय, याचा मला खूप आनंद आहे. याआधी देखील प्रेक्षकांनी माझ्या सर्व भूमिकांना डोक्यावर उचलून धरलं त्यामुळे ही भूमिका देखील त्यांच्या लक्षात राहील आणि त्यांना आवडेल अशी मला खात्री आहे. अजितकुमार आणि मार्तंड यांची जुगलबंदी प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार आहे.’

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Twinkle Khanna Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई पाहून ट्विंकल खन्नाही झाली इन्स्पायर्ड; स्वतःच्याच किचनमध्ये टाकली रेड
तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई पाहून ट्विंकल खन्नाही झाली इन्स्पायर्ड; स्वतःच्याच किचनमध्ये टाकली रेड
Manjeet Kaurs Old Interview: 'त्याला पैसे अन् माझं शरीर दोन्ही हवं होतं', आगीत मृत्यू झालेल्या इन्फ्लुएन्सरची शेवटची मुलाखत व्हायरल; मनातलं सगळं दु:ख सांगितलं
'त्याला पैसे अन् माझं शरीर दोन्ही हवं होतं', आगीत मृत्यू झालेल्या इन्फ्लुएन्सरची शेवटची मुलाखत व्हायरल; मनातलं सगळं दु:ख सांगितलं
Subhash Ghai on Salman Khan: ..तेव्हा सलमान खानने मला शिवीगाळ अन् मारहाण...; सुभाष घईंनी सांगितला पार्टीतला किस्सा, सलीम खान यांची मध्यस्थी
..तेव्हा सलमान खानने मला शिवीगाळ अन् मारहाण...; सुभाष घईंनी सांगितला पार्टीतला किस्सा, सलीम खान यांची मध्यस्थी
Arshad Warsi on Nepotism Kangana Ranaut: बॉलिवूड नेपोटिझमवर अर्शद वारसी थेट बोलला; म्हणाला, 'याची सुरुवात कंगना रनौतमुळे....'
बॉलिवूड नेपोटिझमवर अर्शद वारसी थेट बोलला; म्हणाला, 'याची सुरुवात कंगना रनौतमुळे....'

व्हिडीओ

Mohan Bhagwat on Muslim Statment : भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू नाही Special Report
Nepal flood : घर असावं तर असं! नेपाल महापुरातही सुरक्षित Special Report
Sangli Ganpati Lezim : बाप्पाच्या स्वागताला लेझीमचा ताल, परंपरेचा ठेका | Special Report ABP Majha
Sanjay jadhav Speech Parbhani : मनोज जरांगेंवर भाष्य, माझ्यावर बोलायचा तुमचा नैतिक अधिकार
Shankar Abhyankar Majha Katta : लक्ष्मण रेषा ते रावणाची भक्ती, किती तथ्य, किती मिथ्य? दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान, 3 कंपन्या फायद्यात
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नातेवाईकांना 6 महिने थांबण्याच्या सूचना
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नातेवाईकांना 6 महिने थांबण्याच्या सूचना
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
Kaas Flower Festival : कास पठारावर 1 सप्टेंबरपासून फुलोत्सवाची रंगत; पर्यटकांच्या स्वागतासाठी पठार सज्ज,मंडपघळसह नवे पॉइंट्स विकसित
कास पठारावर 1 सप्टेंबरपासून फुलोत्सवाची रंगत; पर्यटकांच्या स्वागतासाठी पठार सज्ज
मन हेलावणारी घटना; आई-वडिलांसह पर्यटनास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू
मन हेलावणारी घटना; आई-वडिलांसह पर्यटनास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू
Home Loan : गृहकर्ज स्वस्त झालं, घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर
घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याज दर
श्रीलंकेला तगडा धक्का, आयसीसीनं पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा हक्क काढून घेतला; सरकारी हस्तक्षेपाचा आरोप
श्रीलंकेला तगडा धक्का, आयसीसीनं पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा हक्क काढून घेतला; सरकारी हस्तक्षेपाचा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget