Devoleena Bhattacharjee: 'माझी मुलं हिंदू असणार की मुस्लिम हे...' ; ट्रोलरला देवोलीनानं दिलं सडेतोड उत्तर
14 डिसेंबर रोजी देवोलीनानं (Devoleena Bhattacharjee) जिम ट्रेनर शाहनवाजसोबत लग्नगाठ बांधली. देवोलीनानं सोशल मीडियावर (Social Media) तिच्या लग्न सोहळ्याचे फोटो शेअर केले.
Devoleena Bhattacharjee: छोट्या पडद्यावरील साथ निभाना साथिया (Saath Nibhanaya Saathiya) या कार्यक्रमातील गोपी बहु ही भूमिका साकारणारी अभिनेत्री देवोलीनाचा (Devoleena Bhattacharjee) नुकताच विवाह सोहळा पार पडला. 14 डिसेंबर रोजी देवोलीनानं जिम ट्रेनर शाहनवाजसोबत लग्नगाठ बांधली. देवोलीनानं सोशल मीडियावर (Social Media) तिच्या लग्न सोहळ्याचे फोटो शेअर केले. काही नेटकऱ्यांनी देवोलीनाच्या फोटोला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या तर काही लोकांनी तिला ट्रोल केलं. आता एका नेटकऱ्यानं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन 'तुझी मुलं हिंदू असणार की मुस्लिम?' असा प्रश्न देवोलीनाला विचारला. या प्रश्नाला देवोलीनानं उत्तर दिलं आहे.
'तुझी मुलं हिंदू असणार की मुस्लिम?' असा प्रश्न एका नेटकऱ्यानं देवोलीनाला विचारला. देवोलीनानं उत्तर दिल्यानंतर त्या युझरनं ट्वीट डिलीट केले. पण देवोलीनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
देवोलीनानं दिलं सडोतोड उत्तर
देवोलीनानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'माझी मुलं हिंदू असणार की मुस्लिम हे विचारणारे तुम्ही कोण? तुम्हाला जर मुलांची एवढीच काळजी असेल तर अनाथ आश्रमात अनेक मुलं आहेत, जाऊन ती मुलं दत्तक घ्या आणि तुम्हाला वाटेल ते नाव आणि धर्म त्यांना द्या. माझा नवरा, माझी मुलं माझा धर्म आणि माझे नियम. मला याबद्दल विचारणारे तुम्ही कोण आहात?
Whether my babies will be hindu or muslims aap kaun ? Aur itni jab apko baccho ko lekar chinta ho hi rahi hai bohot saare anaath ashrams hai, jaaiye adopt kijiye aur apne hisaab se dharm or naam decide kijiye. Mera pati, mera baccha , mera dharm , mere rules. Aap kaun ? #toxic
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) December 15, 2022
पुढे दुसऱ्या ट्वीटमध्ये देवोलीनानं लिहिलं, 'हा निर्णय माझा नवरा आणि मी घेणार. दुसऱ्यांच्या धर्माबाबत गूगलवर सर्च करण्यापेक्षा स्वत:च्या धर्माकडे फोकस करा आणि एक चांगली व्यक्ती व्हा!' या ट्वीटमध्ये देवोलीनानं टॉक्सिक हा हॅशटॅग वापरला आहे.
Woh mere aur mere pati par chor dijiye. Hum dekh lenge. Aur dusro k dharam pe google search karne k wajai apne dharam par focus kijiye aur acche insaan baniye.Itna toh mujhe yakeen hai aap jaiso se gyaan lene ki mujhe katai zaroorat nahi hai. 😇🙏🏻🧿 #toxic
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) December 15, 2022
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: