एक्स्प्लोर
अभिनेत्री चाहतच्या घरी चिमुकलीचं आगमन!

मुंबई: छोट्या पडद्यावरील कलाकारांसाठी हे वर्ष बऱ्याच गोड बातम्या घेऊन आलं आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले तर काहीच्या घरी 'नवे पाहुणे'ही आले. श्वेता साळवी, रोशनी चोप्रा आणि हृतु दुदानीनंतर आता अभिनेत्री चाहत खन्नाच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अभिनेत्री चाहत खन्नानं शुक्रवारी एका मुलीला जन्म दिला. चिमुकली आणि चाहत दोघींची प्रकृती उत्तम असल्याचं तिच्या पतीनं सांगितलं. चाहतचा पती फरहाननं आपल्या मुलीचं नाव 'जोहरा मिर्जा' ठेवलं आहे. चाहत खन्ना आणि फरहान मिर्जा यांचं लग्न 2013 साली झालं होतं. चाहत खन्नानं सोनी टीव्हीवर 'बडे अच्छे लगते है' मालिकेत काम केलं होतं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























