एक्स्प्लोर

'बिग बॉस मराठी'च्या विजेत्याला मिळणार...

'बिग बॉस मराठी'च्या विजेत्याला आलिशान घर बक्षिस म्हणून मिळणार आहे.

मुंबई : 'बिग बॉस मराठी'चा पहिला वहिला सीझन चांगलाच गाजत आहे. शोचे अवघे काही आठवडे बाकी उरले असल्यामुळे शो जिंकण्यासाठी स्पर्धकही जीवाचं रान करत आहेत. पण गंमत म्हणजे शो जिंकल्यानंतर बक्षिस म्हणून काय मिळणार, हे स्पर्धकांपैकी कोणालाच माहिती नाही. खरं तर 'हिंदी बिग बॉस'मध्ये शो सुरु होतानाच बक्षिसाची रक्कम सांगितली जाते. मात्र मराठीच्या बाबतीत तसं घडलं नाही. अर्थात बिग बॉस मराठीचा विजेता मालामाल होणार एवढं मात्र नक्की. कारण नुकतीच बिग बॉसकडून एक घोषणा करण्यात आली. 'बिग बॉस मराठी'च्या विजेत्याला आलिशान घर बक्षिस म्हणून मिळणार आहे. मुंबईपासून थोडं दूर असलं तरी वन बीएचके फ्लॅटची किंमत किमान 20 लाख रुपये तरी असणारच ना. साधारण 20 लाखांचं घर, प्रत्येक आठवड्यानुसार मिळणारं फिक्स मानधन आणि 'कलर्स मराठी'कडून देण्यात येणारी रोख रक्कम, हे सगळं मिळून बिग बॉस मराठीचा विजेता किमान 50 लाख रुपये घेऊन घरी जाणार यात शंका नाही. बिग बॉसच्या घरात आता आठ स्पर्धक राहिले असून ग्रँड फिनालेसाठी जेमतेम चार आठवडे उरले आहेत. आतापर्यंत आरती सोळंकी, विनित बोंडे, अनिल थत्ते, राजेश शृंगारपुरे, ऋतुजा धर्माधिकारी (वैद्यकीय कारण), जुई गडकरी, सुशांत शेलार (वैद्यकीय कारण), त्यागराज खाडिलकर (वाईल्ड कार्ड), भूषण कडू, उषा नाडकर्णी हे दहा स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला 15 स्पर्धक सहभागी झाले होते, तर तिघांना वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली आहे. मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, आस्ताद काळे, रेशम टिपणीस, स्मिता गोंदकर या सहा स्पर्धकांशिवाय वाईल्ड कार्ड एन्ट्रीने आलेले शर्मिष्ठा राऊत, नंदकिशोर चौगुले हे दोघे जण सध्या घरात आहेत. काही आठवड्यांपूर्वी अभिनेत्री हर्षदा खानविलकर बिग बॉसच्या घरात आली होती. मात्र ती केवळ पाहुणी म्हणून स्पर्धेत सहभागी झाली होती. मेघा, सई, नंदकिशोर, स्मिता आणि शर्मिष्ठा हे पाच स्पर्धक यावेळी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे येत्या रविवारी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
म्हणून 'बिग बॉस'च्या घरात पुष्कर बिकीनीमध्ये फिरतोय
बिग बॉस मराठी : नंदकिशोरने मेघाला बुटावर नाक घासायला लावलं
बिग बॉस मराठी : पुनरागमनावर ऋतुजाची इन्स्टाग्राम पोस्ट
बिग बॉस : आस्ताद, मेघाला हरवत पुष्कर कर्णधार बनला
हे 'बिग बॉस मराठी'चं घर नाही, बस आहे...
बिग बॉस मराठी : अभिनेता सुशांत शेलार घराबाहेर
बर्थ डे स्पेशल : मेघा धाडेबद्दलच्या रंजक गोष्टी
'मराठी बिग बॉस'मध्ये आणखी एक वाईल्ड कार्ड एण्ट्री
बाहेर आल्यावर पहिल्यांदा बायकोला...... : राजेश शृंगारपुरे
राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'च्या घरातून बाहेर
बिग बॉसच्या घरातील हर्षदाच्या एन्ट्रीला भरभरुन प्रतिसाद
रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार
बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते
बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरती
मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाला दमदार सुरुवात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP MajhaJayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
×
Embed widget