Bigg Boss Contestant Swami Om | बिग बॉसचे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचं निधन
Bigg Boss Contestant Swami Om : टेलिव्हिजन विश्वातील सर्वाधित चर्चेत असणाऱ्या शोमध्ये दिसून आलेले स्पर्धक स्वामी ओम यांचं निधन झालं आहे. ते 63 वर्षांचे होते.
Bigg Boss Contestant Swami Om : प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले स्वामी ओम यांचं निधन झालं आहे. ते 63 वर्षांचे होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, आज त्यांची प्राणज्योत मालवली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी ओम यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासूनच ते प्रकृती अस्वास्थाने त्रस्त होते.
स्वामी ओम अनेक विवादांमुळे चर्चेत राहिले
दरम्यान, स्वामी ओम 2017 मध्ये बिग बॉसमध्ये दिसून आले होते. या सीझनमध्ये त्यांच्यामुळे अनेक वाद झाले होते. तसेच अनेकदा स्वामी ओम यांनी बिग बॉसच्या घरात आपल्या मर्यादाही ओलांडल्या होत्या. त्यांनी बिग बॉसच्या 10व्या सीझनमध्ये प्रतिस्पर्धी रोहम मेहरा आणि बानी यांच्या अंगावर मूत्र फेकलं होतं. यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला थोबाडीत मारल्याचाही दावा केला होता. बिग बॉसमध्ये गेल्यानंतर अनेक हिंदू संघटनांनी स्वामी ओम यांच्यावर बहिष्कार घातला होता.
2019 मध्ये निवडणुकही लढले होते स्वामी ओम
स्वामी ओम यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्ली लोकसभेसाठी निवडणुकही लढवली होती. ते म्हणाले होते की, "ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हिंदू विरोधी विचारांविरोधा निवडणूक लढत आहेत."
दरम्यान, स्वामी ओम यांच्या जन्म 24 डिसेंबर 1957 मध्ये झाला होता. त्यांनी अॅस्ट्रॉलॉजीमध्ये पीएचडी केली होती. टेलिव्हिजन चॅनलवरील एका मुलाखतील स्वामी ओम यांनी एका अॅस्ट्रॉलॉजरला थोबाडीतही मारली होती. त्यावरुन स्वामी ओम वादाच्या भोवऱ्यातही अडकले होते.