(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात पुन्हा भांडण; ईशामुळे अभिषेक आणि समर्थमध्ये झाली बाचाबाची, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 17: नुकताच बिग बॉस 17 नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अभिषेक आणि समर्थ यांच्यामध्ये बाचाबाची झालेली दिसत आहे.
Bigg Boss 17: अभिनेता समर्थ जुरेलने (Samarth Jurel) बिग बॉस 17 च्या (Bigg Boss 17) घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री केली. त्याच्या एन्ट्रीनंतर शोमध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत. अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि समर्थमध्ये भांडणही होताना दिसत आहे. नुकताच बिग बॉस 17 नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अभिषेक आणि समर्थ यांच्यामध्ये बाचाबाची झालेली दिसत आहे.
बिग बॉस 17 या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अभिषेक समर्थकडे येतो आणि म्हणतो 'तुला काय बोलायचे आहे?' यावर समर्थ म्हणतो "तू ईशाला का सांगितलेस की, जर ती माझ्यावर प्रेम करत असेल तर ती 2 महिन्यांत कशी मुव्ह ऑन करेल? तिने एका दिवसात मुव्ह ऑन असे तुम्हाला वाटते का? तिला पाहिजे ते ती करू शकते. ती आता माझ्यासोबत आहे. ईशा ही इथे हक्काने राहू शकते. महिलांचा आदर करायला शिक." नंतर अभिषेकलाही राग येतो. बिग बॉस 17 या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये पुढे दिसते की, अभिषेक आणि समर्थ यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण होते. बिग बॉस 17मधील सर्व सदस्य त्यांचे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. बिग बॉस 17 च्या या प्रोमोची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
अभिषेक आणि ईशा यांनी बिग बॉस 17 मध्ये एकत्र एन्ट्री केली होची. एकीकडे अभिषेक ईशाच्या प्रेमात होता तर दुसरीकडे ईशाला त्याच्यासोबत फक्त मैत्रीचे नाते ठेवत होती. अभिषेकच्या म्हणण्यानुसार, तो 1 वर्षापूर्वी ईशासोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, ईशाने या गोष्टीला नकार दिला. आता समर्थची (ईशाचा सध्याचा बॉयफ्रेंड) बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे . समर्थांच्या एन्ट्रीनंतर अभिषेक खूप भावूक झाला. तर ईशाने यापूर्वी समर्थला तिचा प्रियकर म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, नंतर तिने आपली चूक मान्य केली.
विकी जैन, अंकिता लोखंडे मुनव्वर फारुकी,मनारा चोप्रा,नावेद सोल,अनुराग डोभाल,जिग्ना वोरा,सोनिया बन्सल यांनी देखील बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: