IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 Mega Auction : मुंबई, चेन्नई अन् आरसीबीपासून सर्वच 10 आयपीएल संघांनी पुढील हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे.
IPL 2025 Mega Auction : मुंबई, चेन्नई अन् आरसीबीपासून सर्वच 10 आयपीएल संघांनी पुढील हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. आरसीबीने नुकतेच दिनेश कार्तिकवर नवी जबाबदारी सोपवली आहे. आयपीएल 2025 ला आठ ते दहा महिन्याचा कालावधी आहे. पण त्याची तयारी मात्र आतापासूनच सुरु झाली आहे. आगामी आयपीएल (Indian Premier League) खास होणार आहे. कारण, त्याआधी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. जगभरातील दिग्गज खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबर 2024 मध्ये आयपीएल लिलाव पार पडणार आहे. त्यासंदर्भात बीसीसीकडून सर्व दहा संघांसोबत संपर्क केला आहे.
रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयकडून सर्व दहा संघामालकासोबत संपर्क साधलाय. यामध्ये अनेक मुद्द्यावर चर्चा झाली, तसेच काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले. ज्यामध्ये खेळाडूंना कायम ठेवण्याचा नियमाचाही समावेश आहे. त्याशिवाय संघाची रक्कमही वाढवण्यात यावी, फ्रँचायझीकडून असेही सांगण्यात आलेय. म्हणजेच, संघाला लिलावात वापरण्यात येणारी रक्कम वाढवण्यात यावी, अशी मागणी बीसीसीआयकडे करण्यात आलेली आहे. 2024 साठी संघाच्या पर्सची मर्यादा 100 कोटी रुपये होती, याचा अर्थ प्रत्येक फ्रँचायझीकडे खेळाडूंना खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त 100 कोटी रुपये होते. मात्र आता पगाराची मर्यादा 20 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी कऱण्यात आली आहे. यावर बीसीसीआयकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचं समोर आलेय, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
20 टक्के रक्कम वाढण्याची शक्यता
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, सर्व 10 फ्रँचायझींच्या मालकांनी बीसीसीआयकडे पगाराची मर्यादा 20 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केलीय. 2023 ते 2024 पर्यंत पगाराची मर्यादा 5 टक्क्यांनी वाढवण्यात आली . म्हणजे 95 कोटींवरून 100 कोटींवर करण्यात आली होती. आता यामध्ये 20 टक्के आणखी वाढ करण्याची मागणी कऱण्यात आली आहे. IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी पगाराची मर्यादा किमान 10 टक्क्यांनी वाढू शकते असा अंदाज आहे. म्हणजेच 10 संघांची एकूण पगाराची मर्यादा पाहिल्यास रक्कम 10 अब्ज रुपयांपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे.
Salary Cap likely to be around 110-120 crores for IPL 2025 Mega Auction. [Cricbuzz] pic.twitter.com/gpH4ES94Zv
— Johns. (@CricCrazyJohns) July 2, 2024
खेळाडूंना फायदा होणार का?
मेगा लिलावावेळी संघाकडे जितके जास्त पैसे असतील तितके जास्त पैसे आवडत्या खेळाडूंवर खर्च करता येऊ शकतात. आयपीएल 2024 च्या लिलावात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हे दोन खेळाडू महागडे ठरले होते. कमिन्सवर 20.5 कोटी तर पॅट कमिन्सवर 24.7 कोटींची बोली लागली होती. स्टार्क आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. आता संघाच्या पर्समधील रक्कम वाढल्यास खेळाडूंनाच मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.