(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial Report
नागपुरात झालेल्या आंदोलनाबाबत आता एक नवी माहिती समोर आलीय. या आंदोलनात नागपूरच्या बाहेरच्यांचा काही सहभागी होता का असा संशय उत्पन्न झालाय. स्मारक समितीने सुरू केलेल्या सौदर्यकरण प्रकल्पाला अचानक विरोध कसा काय सुरू झाला, इथपासून कालच्या आंदोलनापर्यंत अनेक प्रश्न निर्माण होतात. या संदर्भात एबीपी माझाने थेट स्मारक समिती विश्वस्तांशी चर्चा केली... त्यातून कोणती माहिती समोर आलीय. पाहूया हा रिपोर्ट
देशातलंच नाही तर जगातलं एक महत्त्वाचं श्रद्धास्थान...
या ऐतिहासिक भूमीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
विचारांचा अंकूर पेरला, त्याचा आता जगभरात वटवृक्ष झालाय.
मात्र इथल्या सौंदर्यीकरण प्रकल्पातील
अंडरग्राऊंड कामाला विरोध करत १ जुलैला आंदोलन पेटलं.
अंडरग्राऊंड सुरु असलेल्या विरोधाची कारणं जाणून घेण्यासाठी
एबीपी माझाने स्मारक समितीच्या विश्वस्तांशी चर्चा केली.
त्यांनी दिलेली माहितीही या प्रकरणात जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल.