IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
Sanju Samson : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पाच सामन्यांची टी 20 मालिका 6 जुलै रोजी सुरु होणार असून ती 14 जुलैपर्यंत चालणार आहे. यावेळी भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी शुभमन गिलकडे देण्यात आली आहे.
Dhruv Jurel vs Jitesh Sharma : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पाच सामन्यांची टी 20 मालिका 6 जुलै रोजी सुरु होणार असून ती 14 जुलैपर्यंत चालणार आहे. यावेळी भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी शुभमन गिलकडे देण्यात आली आहे. झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी आज टीम इंडिया रवाना झाली आहे. मालिका सुरु होण्याआधीच टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी निवड झालेल्या संघातील सदस्य संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे तिघे बार्बाडोसमध्ये अडकून पडल्यानं ते भारतीय संघासोबत जॉईन होईपर्यंत साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा या तिघांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. संजू सॅमसन पहिल्या 2 सामन्यात प्लेईंग 11 चा भाग नाही. त्यामुळे त्याच्या जागी विकेटकिपर कोण असेल? ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा यांच्यातील कुणाला भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल? याबाबत चर्चा सुरु आहे.
ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा या युवा दोन विकेटकीपरपैकी एकाची निवड करणे टीम इंडियाच्या व्यवस्थापनासाठी सोपे नसेल. जितेश शर्माला टी20 क्रिकेटचा दांडगा अनुभव असल्यामुळे पारडे जड मानले जातेय. जितेश शर्माचा टी-20 मधील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. पण ध्रुव जुरेल यानं टीम इंडियासाठी कसोटीमध्ये विकेटकीपरची भूमिका बजावली आहे. त्याच्याकडे टी20 चा अनुभव नाही. पण आयपीएल खेळण्याचा अनुभवी त्याच्या पाठीशी आहे. यंदाच्या हंगामात त्याने 14 सामन्यात 195 धावा केल्यात.पण ध्रुव जुरेल खूपच कमी फलंदाजीची संधी मिळाली. त्याला भविष्यातील स्टार मानला जात आहे, परंतु आजपर्यंत त्याला फारशा संधी मिळालेल्या नाहीत.
ध्रुव जुरेलच्या तुलनेत जितेश शर्माकडे जास्त अनुभव आहे. ध्रुव जुरेल यानं 38 टी20 सामन्यात 138 च्या स्ट्राईक रेटने 439 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकाचा समावेश आहे. तर जितेश शर्माने आतापर्यंत 120 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 147 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने 2490 धावा केल्या आहेत. जितेश शर्मा आणि ध्रुव जुरेल दोघांकडेही फिनिशिंगचा अनुभव आहे. त्यामुळे टीम इंडियात कुणाला संधी मिळते, याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडिया
शुभमन गिल (कर्णधार),ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, रिंकु सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), हर्षित राणा, रियान पराग, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे