Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात विकी आणि अंकितामध्ये झालं कडाक्याचं भांडण! विकीवर भडकले नेटकरी, म्हणाले...
Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात नुकतेच अंकिता आणि विकी यांच्यात भांडण झाले आहे. त्यांच्या या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Bigg Boss 17: बिग बॉस सीझन 17 (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय झाला आहे. बिग बॉस - 17 शोमध्ये टीव्ही सेलिब्रिटींपासून ते सोशल मीडिया स्टार्सपर्यंत अनेक स्पर्धक सहभागी झाले आहे. या शोमध्ये रिअल लाईफ कपल अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) देखील सहभागी झाले आहेत. ही जोडी शोमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवत आहे. बिग बॉसच्या घरात नुकतेच अंकिता आणि विकी यांच्यात भांडण झाले आहे.
बिग बॉसच्या घरात विकी जैन हा अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांचा मित्र झाला आहे. नुकतेच अंकिताचे अभिषेकसोबत भांडण झाले होते. दुसर्या दिवशी सकाळी विकी अभिषेक आणि ईशासोबत बसून बोलत होता, याच दरम्यान अंकिता तिथून जाते आणि विकी अभिषेक हे बोलताना बघून चिडते. अंकिताचे हे वागणे विकीला आवडत नाही आणि तो चिडतो. नंतर विकी त्याची बायको अंकितासोबत बसून बोलतांना दिसतो आणि या दरम्यान तो अंकितावर ओरडायला लागतो.विकी अंकिताला सांगतो, “हे खूप वाईट आहे. ही तुझी सर्वात वाईट बाजू आहे जी मी कधीही पाहिली नाही." नंतर विकी रागावतो आणि निघून जातो.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
विकीवर भडकले नेटकरी
विकी जैन आणि अंकिता यांच्या बिग बॉसच्या घरातील भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विकीला ट्रोल केले. एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'विकी जैनचे हे वाईट वर्तन आहे आणि तो हे विसरला आहे की, तो फक्त अंकितामुळेच बिग बॉस 17 मध्ये आला आहे. तो खेळात चांगला आहे पण पत्नी अंकितासाठी त्याने वापरलेले शब्द अनादर करणारे आहेत.'
This is just pathetic behaviour by #VickyJain he is forgetting he came to #BiggBoss17 because of #AnkitaLokhande He is doing good in game but the words used by him for his wife is so disrespectful. https://t.co/vYND8UZQSu
— youhearthebest (@mylifemywish89) October 27, 2023
मुनव्वर फारुकी,मनारा चोप्रा,नावेद सोल,अनुराग डोभाल,जिग्ना वोरा,सोनिया बन्सल यांनी देखील बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: