Bigg Boss 17 : "सुशांतबाबत मी कायम पझेसिव्ह होते"; 'बिग बॉस 17'च्या घरात अंकिता लोखंडेचा खुलासा
Ankita Lokhande Recall Sushant Singh Rajput : अंकिता लोखंडेने 'बिग बॉस'च्या घरात खुलासा केला आहे की ती खूप पझेसिव्ह गर्लफ्रेंड होती.
Ankita Lokhande Remember Sushant Singh Rajput in Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) मात्र वारंवार एक्स बॉयफ्रेंड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) आठवण येत आहे.
'बिग बॉस 17'मधील अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे स्पर्धक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. लोकांचं लक्ष कसं वेधून घ्यायचं हे या दोघांनाही चांगलं माहिती आहे. अंकिता-विकीचा रोमँटिक अंदाज ते त्यांचे वाद किंवा अंकिताच्या प्रेग्नंसीची चर्चा असो किंवा अभिनेत्रीने केलेलं सुशांत सिंह राजपूतबद्दलचं वक्तव्य, अशा सर्वच गोष्टींमुळे अंकिता आणि विकी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अंकिताला सुशांत सिंह राजपूतची आठवण आली आहे. ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्यासोबत अंकिता सुशांतबद्दल बोलत होती.
For those who are saying how dare #AnkitaLokhande talk about SSR? Listen, Ankita has the right to talk about SSR as they were in a relationship. You won't decide what Ankita says; many of you didn't even watch his movies when he was alive.pic.twitter.com/VzO8U5P1Eg
— Lady Khabri (@KhabriBossLady) December 3, 2023
अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत
'बिग बॉस 17'च्या घरात पुन्हा एकदा अंकिता लोखंडेला सुशांत सिंह राजपूतची आठवण आली आहे. 'झलक दिखला जा'मधील आठवण शेअर करत अंकिता म्हणाली,"सुशांत माझ्यासाठी खूप खास होता. त्यासाठी मी कोणासोबतची भांडायचे. मी खूप पझेसिव्ह गर्लफ्रेंड होते".
अंकिता पुढे म्हणाली,"झलक दिखला जा' या कार्यक्रमात सुशांत एका मुलीसोबत डान्स करत होता. त्यावेळी मी त्याला खूप ओरडले होते. मी खूपच पझेसिव्ह मुलगी आहे. पण आता पझेसिव्हनेस कमी करण्यावर माझा भर आहे. सुशांत कोणा मुलीसोबत बोलत असेल तर त्या गोष्टीचा मला खूप राग यायचा". 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर अंकिता-सुशांतची पहिली भेट झाली. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला होता.
संबंधित बातम्या