एक्स्प्लोर

Ankita Lokhande : सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यसंस्काराला अंकिता लोखंडे का गेली नव्हती? 'Bigg Boss'च्या घरात अभिनेत्रीने सांगितलं कारण

Anikita Lokhande Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यसंस्काराला अंकिता लोखंडे गेली नव्हती. आता 'बिग बॉस'च्या (Bigg Boss 17) घरात अभिनेत्रीने यामागचं कारण सांगितलं आहे.

Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रमात सहभागी झाली आहे. अंकितासह तिचा पती विकी जैनदेखील (Vicky Jain) 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाला आहे. अंकिता लोखंडेमुळे 'बिग बॉस 17' हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्री कधी प्रेग्नंट असल्याचा दावा करते तर कधी सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) भाष्य करते. त्यामुळे कार्यक्रमाचा टीआरपी वाढतो. आता अभिनेत्रीने सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचं कारण सांगितलं आहे.

'बिग बॉस'च्या घरात पुन्हा एकदा अंकिताला दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आठवण आली आहे. अंकिताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मुनव्वर फारुकीसोबत सुशांतच्या अंत्यसंस्काराबद्दल भाष्य करताना दिसत आहे. मुनव्वर अंकिताला एक शायरी ऐकवतो. त्यानंतर अभिनेत्री 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातील गाणं गुणगुणायला सुरू करते. 

सुशांत माणूस म्हणून खूप चांगला होता : अंकिता लोखंडे

अंकिताने 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातील गाणं गायल्यानंतर मुनव्वरला आनंद होतो. अंकिताला तो म्हणतो,"एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाच्या विशेष स्क्रीनिंग दरम्यान मी सुशांतला भेटलो होतो". त्यानंतर अंकिता भावूक होत म्हणते,"सुशांत माणूस म्हणून खूप चांगला होता. आता तो या जगात नाही हे स्वीकारायला खूप वेळ लागला. 

अंकिता पुढे म्हणते,"सुशांत विकीचाही चांगला मित्र होता. एखाद्याला गमवायची माझी ती पहिलीच वेळ होती. सुशांतच्या निधनाचा मला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्याच्या अंत्यसंस्कारालाही मी गेले नाही. मला ते सहनच झालं नसतं. त्यावेळी विकीने मला जायला सांगितलं होतं. पण माझी हिंमत झाली नाही. सुशांतला त्या अवस्थेत मी पाहूच शकले नसते". 

अर्चना-मानवची ऑफस्क्रीन केमिस्ट्री अन् बरचं काही...

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूतची 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. मालिकेतील अर्चना-मानवच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणे त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही फुलत गेली. आधी दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांचं लग्न व्हावं अशी चाहत्यांची खूप इच्छा होती. पण रिलेशनशिपच्या काही वर्षांनंतर त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर अंकिता लोखंडे विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली. 

संबंधित बातम्या

Ankita Lokhande : पीरियड्स आले नाहीत, घरी जाऊ द्या.... अंकिता लोखंडेची 'Bigg Boss'च्या घरात प्रेग्नन्सी टेस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget