
'मराठी बिग बॉसमधून हिंदीमध्ये गेल्यावर टार्गेट केलं जातं पण...'; बिग बॉस-16 च्या निकालावर भरभरुन बोलला शिव ठाकरे
बिग बॉस-16 (Bigg Boss 16) च्या निकालावर शिव ठाकरेनं (Shiv Thakare) प्रतिक्रिया दिली आहे.

Shiv Thakarey: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम बिग बॉस-16 (Bigg Boss 16) चा ग्रँड फिनाले काही दिवसांपूर्वी पार पडला. या कार्यक्रमाचा विजेता रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) ठरला. एमसी स्टॅन, शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस 16 चे टॉप-3 स्पर्धक होते. बिग बॉस-16 चा निकालावर अनेक जण नाराज होते. शिव ठाकरे हा बिग बॉस-16 चा विजेता ठरवा, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. पण आता बिग बॉस-16 च्या निकालावर शिव ठाकरेनं प्रतिक्रिया दिली आहे.
शिव ठाकरे म्हणाला, 'सर्वांची वाट लावून फायनलपर्यंत पोहोचलो'
अमरावतीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिव ठाकरेनं बिग बॉस-16 च्या निकालावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'जे होतं ते चांगलंच होतं, माझ्या नशिबात काही वेगळं लिहिलं असेल. मी आनंदी आहे की माझ्या मित्राने स्पर्धेत बाजी मारली. पहिल्या दिवशी मी जेव्हा बिग बॉसच्या घरात गेलो तेव्हाच ठरवलं होतं की अखेरपर्यंत राहायचं. जेंव्हा तुम्ही मराठी बिग बॉसमधून हिंदीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला टार्गेट केलं जातं, पण आपण त्या सर्वांची वाट लावून फायनलपर्यंत पोहोचलो.'
पुढे शिव म्हणाला, 'प्रेम करणारे लोकं असतात त्यांना वाईट वाटतेच असतं, पण ट्रॉफी कुणाला तरी एकालाच मिळते. माझ्यासाठी लोकांच्या डोळ्यात अश्रू आले, ते माझ्यावर प्रेम करत होते आणी मी तिथंच जिंकलो. बिग बॉस बद्दल मला खूप रिस्पेक्ट आहे, मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. सहा वर्षा पासून तुम्ही एका गोष्टीच्या मागे असता आणी ती मिळत नाही तेव्हा वाईट वाटतं, पण माझा मित्र जिंकला मी आनंदी आहे.'
पुढील प्रोजेक्ट्सबद्दल काय म्हणाला शिव?
'आता लवकरच मी छोट्या पडद्यावर दिसणार आहे त्याबद्दल मी आत्ता काही जास्त बोलू शकत नाही आणि भविष्यात मोठ्या पडद्यावर दिसणार', असंही शिव ठाकरे यांनी एबीपी माझाला सांगितले.
शिव ठाकरे 'बिग बॉस' आधी एमटीव्हीच्या 'रोडीज' या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. शिव हा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता आहे. या कार्यक्रमामुळे शिवला विशेष लोकप्रियता मिळाली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Shiv Thakare : एमसी स्टॅन 'बिग बॉस'चा विजेता झाल्याचा मला अभिमान वाटतो : शिव ठाकरे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
