Akshaya Deodhar: “पावसाळा संपत आला, येईल आता हिवाळा, हार्दिकरावांचं नाव घेते..."; मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये अक्षया देवधरने घेतला खास उखाणा
Akshaya Deodhar And Hardeek Joshi: नुकतीच अक्षयाची पहिली मंगळागौर पार पडली. अक्षयानं तिच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Akshaya Deodhar And Hardeek Joshi: अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) या दोघांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये लग्नगाठ बांधली. अक्षया आणि हार्दिक हे दोघे लग्नानंतरचा प्रत्येक सण थाटामाटात साजरा करत आहेत. नुकतीच अक्षयाची पहिली मंगळागौर पार पडली. अक्षयानं तिच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामधील एका व्हिडीओमध्ये अक्षया ही उखाणा घेताना दिसत आहे.
“पावसाळा संपत आला…येईल आता हिवाळा, हार्दिकरावांचं नाव घेते, मंगळागौरीच्या कार्यक्रमात छान पार पडला मानसीचा सोहळा” असा उखाणा अक्षयानं मंगळागौरीच्या कार्यक्रमात घेतला आहे. तिच्या उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
View this post on Instagram
अक्षयानं मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता. हिरवी साडी, दागिने आणि नाकात नथ असा लूक अक्षयानं केला होता.अक्षयाच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये अक्षया आणि हार्दिक हे दोघे पूजा करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी 2 डिसेंबर 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. पुण्यातील ढेपे वाड्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
अक्षया आणि हार्दिक हे दोघे 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले.या मालिकेमध्ये अक्षयानं पाठकबाई ही भूमिका साकारली तर हार्दिकनं या मालिकेत राणादा भूमिका साकारली होती. या मालिकेतील अक्षया आणि हार्दिक यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांची मनं जिंकली. त्यानंतर हे रिल लाईफ कपल रिअल लाईफ कपल झाले.
हार्दिक आणि अक्षयाचा चाहता वर्ग मोठा आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. हार्दिक आणि अक्षया हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. यांच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळत असते.
संबंधित बातम्या