एक्स्प्लोर
कपिल शर्माच्या शोमध्ये ए. आर. रहमानची उपस्थिती

मुंबई : इंडियन मोझार्ट अशी ज्याची ख्याती आहे, ते सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'द कपिल शर्मा शो'मध्ये रहमान झळकणार आहेत.
ए. आर. रहमान प्रसिद्धीझोतापासून दुर राहणंच पसंत करतात. त्यांनी आतापर्यंत टीव्हीवरील फारशा कार्यक्रमांना हजेरी लावलेली नाही, मात्र कॉमेडीकिंग कपिल शर्माच्या वाट्याला रहमान यांच्यासोबत स्टेज शेअर करण्याचं भाग्य मिळालं आहे.
कपिलच्या शोमध्ये मात्र रहमान यांची कळी खुलल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्सनी दिली आहे. खुद्द कपिल शर्माने त्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून ट्विटरवरही कार्यक्रमाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो पाहायला मिळत आहेत.
https://twitter.com/neetisimoes/status/751119399751454720
'मी लहानपणापासून ज्यांची भक्ती करतोय, ते ए. आर. रहमान' असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं आहे. कार्यक्रमाच्या निर्मात्या निती सिमोस यांनीही एक फोटो ट्वीट केलेला आहे. या भागाच्या प्रक्षेपणाची नेमकी तारीख अद्याप समजलेली नसली, तरी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
काहीच दिवसांपूर्वी सैराट चित्रपटाच्या टीमने कपिलच्या शोमध्ये धुमाकूळ घातला होता. त्याशिवाय सलमानसोबत सुलतानचा एपिसोडही विशेष गाजत आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























