Swara Bhasker : 'निःपक्षपाती आणि जबाबदार नेते!', स्वरा भास्करनं ट्वीट करत मानले उद्धव ठाकरेंचे आभार
अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhasker) देखील आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

Swara Bhasker : सध्या एकनाथ शिंदे आणि काही आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी (29 जून) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर मत व्यक्त केलं. मराठी चित्रपसृष्टीबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिल्या. अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhasker) देखील आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. स्वरानं या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक देखील केलं आहे.
स्वराचं ट्वीट
'स्वरानं शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'उद्धव ठाकरेजी तुम्ही केलेल्य कामाबद्दल मी तुमचे आभार मानते. तुम्ही निःपक्षपाती आणि राज्याचे जबाबदार नेते होता. तुम्ही कोरोना काळात केलेले पारदर्शक काम काम केलं. तुमच्या कामानं तुम्ही माझ्यासारख्या समीक्षकाला तुमचे प्रशंसक बनवले. तुमचे काम कौतुकास्पद होते.' असं ट्वीट स्वरानं शेअर केलं आहे.
Thank you for your leadership @OfficeofUT U were unbiased & a responsible Leader of the State, transparent, communicative & assuring during COVID-19 crisis. Ur conduct turned critics like me into admirers. Work of Maha adm under u has been laudable. Go long & go strong. ✊🏽✨
— Swara Bhasker (@ReallySwara) June 29, 2022
स्वरानं उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्यानं स्वराच्या ट्वीटला रिप्लाय करत लिहिले, 'स्वरा तु स्वत:च्या कार्यकाळात कोणतं काम केलसं? ते सांग'
दिव्या दत्ता आणि शबाना आझमी यांच्या शीर कोरमा या चित्रपटामध्ये स्वरानं महत्त्वाची भूमिका साकारली. स्वरा सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या नव्या प्रोजेक्ट्सची माहिती देत असते. 'जहा चार यार' हा स्वराचा आगमी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये स्वरासोबत मेहर विज, शिखा तसलानिया आणि पूजा चोप्रा या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे कथानक हे चार मैत्रीणींच्या आयुष्यावर आधारित आहे. विरे दी वेडींग, गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. स्वराच्या आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात.
हेही वाचा:
- Swara Bhasker Death Threat: आधी ‘दबंग’ सलमान खान, आता अभिनेत्री स्वरा भास्करलाही जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र!
- Swara Bhasker : नुपूर शर्मांबाबतचे गौतम गंभीर यांचे ट्वीट चर्चेत; स्वरा भास्कर म्हणते....
- Swara Bhasker : अभिनेत्रीची #FreeJigneshMevani मोहीम! जिग्नेश मेवाणीच्या अटकेनंतर स्वरा भास्कर संतापली!























