एक्स्प्लोर

स्वप्नील जोशीचा ‘अश्वत्थ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; टीझर प्रदर्शित

Swapnil Joshi Movie Ashwattha : स्वप्नीलचा ‘अश्वत्थ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Swapnil Joshi Movie Ashwattha :  मराठीतील आघाडीचा सुपरस्टार स्वप्नील जोशीने (Swapnil Joshi) नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली असून त्याच्या नवीन ‘अश्वत्थ’ (Ashwattha) या चित्रपटाची घोषणा केली आहे. लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अश्वत्थ’ २०२२ च्या हिवाळ्यात प्रदर्शित होणार असून स्वप्नील जोशीने या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर आज प्रकाशित करत असल्याची घोषणा केली.

‘अश्वत्थ’चा टीझर भगवत गीतेतील एका लोकप्रिय अशा श्लोकाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. संकृतमधील या श्लोकाचा ढोबळ अर्थ असा –जेव्हा मनुष्य योगारूढ होतो तेव्हा तो आपला उद्धार स्वतःच करतो आणि स्वतःच आत्मबलाच्या सामर्थ्यावर ऊंची गाठतो. त्याने आपल्या आत्म्याचे अधःपतन होवू देता कामा नये. मनुष्य स्वतःच स्वतःचा बंधू असतो आणि स्वतःच स्वतःचा शत्रू असतो...

चौखूर उधळलेल्या घोड्याच्या पृष्ठभूमीवर सादर होणाऱ्या या श्लोकानंतर टीझरमध्ये मराठी शब्द उधृत होतात. ते आहेत, “मन, बुद्धी, चित्त आणि अहंकारावर मात करून स्वाभिमानाने जगतो तो अश्वत्थ.” या टीझरच्या माध्यमातून चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक या चित्रपटाच्या एकूण कथेबद्दल एक कल्पना अधोरेखित करतात. त्यातून मग या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी ताणली जाते.

या टीझरचा व्हीडीओ प्रसारित करून स्वप्नील जोशीने आपल्या चाहत्यांबरोबर ही गोड बातमी शेअर केली आहे. तो म्हणतो, “नवीन वर्ष, नवीन संकल्प! नांदी...नव्या वर्षाची, नव्या संकल्पाची! नांदी…अश्वत्थची !!!”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक लोकेश गुप्तेने केले आहे. एबी आणि सीडी, एक सांगायचंय,ऋुणानुबंध, डेटभेट आणि मुंगळा यांसारख्या दर्जेदार चित्रपटांनी आपले वेगळे स्थान लोकेशने याआधीच चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवा मैलाचा दगड उभा करण्यास तो सज्ज झाला आहे. टीझरमध्ये मकरंद देशपांडेचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे यात मकरंदसुद्धा आहे का, याबद्दलहि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे. चित्रपट २०२२च्या हिवाळ्यात प्रदर्शित होणार आहे.

स्वप्निल जोशीची मुख्य भूमिका असलेल्या ‘अश्वत्थ’च्या पोस्टरची सोशल मिडीयासकट सगळीकडे जोरदार चर्चा असून, अनेक सुपरहीट चित्रपटांनंतर स्वप्निलला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. इतर कलाकार आणि तंत्रज्ञ याबद्दलची माहिती अजून गुलदस्त्यात असली तरीस्वप्नील जोशी आणि लोकेश गुप्ते हे नवं समीकरण, नव्या वर्षात, ‘अश्वत्थ’च्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर काहीतरी नवं आणणार, याबद्दल सर्वांनाच खात्री आहे.

विविध प्रयोग करत स्वतःच्या सशक्त अभिनयाने चित्रपट, मालिका, वेबसिरीज यांच्या माध्यमातून आज स्वप्नील जोशी घराघरात पोहोचला आहे. रामायण, कृष्ण, हद कर दि, दिल विल प्यार, तू तू मैं मैं या गाजलेल्या मालिकांपासून दुनियादारी, मोगरा फुलला, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे अगणित गाजलेले चित्रपट स्वप्नीलच्या नावावर आहेत. अलीकडेच आलेल्या ‘समांतर’ या वेबसिरीजमध्ये स्वप्नीलची प्रमुख भूमिका होती आणि तिचे दोन्ही सिझन गाजले होते. या पार्श्वभूमीवर स्वप्नीलच्या या नवीन चित्रपटाबद्दल रसिकांच्या मनात उत्सुकता लागून राहिली आहे.

संबंधित बातम्या

AR Rahman Daughter Engagement : ए.आर.रेहमानच्या मुलीचा साखरपुडा संपन्न; कोण आहेत रेहमानचे जावई?

John Abraham :  बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; अभिनेता जॉन अब्राहमला कोरोनाची लागण, पत्नीही पॉझिटिव्ह

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Water Crisis : बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
Sanjay Raut : 'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
IPL 2024: RCB vs SRH: 6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vishal Patil vs Chandrahar Patil Sangli : सांगलीचे दोन पैलवान समोरा-समोर, विशाल आणि चंद्रहारची भेटManoj Jarange Voting : रुग्णालयातून थेट मतदान केंद्रावर,  मनोज जरांगे यांनी बजावला मतदानाचा हक्कLok Sabha Election Phase 2 Voting  :  राजश्री पाटील यांचं कुटुंबीयांनी औक्षण केलं : ABP MajhaSanjay Jadhav Lok Sabha : देवदर्शन करुन संजय जाधव मतदानाला निघाले, परभणीत जानकर विरुद्ध जाधव लढत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Water Crisis : बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
Sanjay Raut : 'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
IPL 2024: RCB vs SRH: 6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
Shruti Haasan : अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सुपरस्टारच्या लेकीचं ब्रेकअप? म्हणाली, 'माझ्यासाठी नात्यात विश्वास महत्त्वाचा'
अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सुपरस्टारच्या लेकीचं ब्रेकअप? म्हणाली, 'माझ्यासाठी नात्यात विश्वास महत्त्वाचा'
Dindori Lok Sabha : दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, नाराज जे पी गावित आज भरणार उमेदवारी अर्ज
दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, नाराज जे पी गावित आज भरणार उमेदवारी अर्ज
भारताला फायदा चीनला फटका, व्यापारात भारतानं घेतली आघाडी, सेवा निर्यातीत मोठी वाढ
भारताला फायदा चीनला फटका, व्यापारात भारतानं घेतली आघाडी, सेवा निर्यातीत मोठी वाढ
IPL 2024 Virat Kohli And Rinku Singh: तुझी शपथ भाई...रिंकू सिंग होता अस्वस्थ; कोहली ओरडलाही, आता आनंद गगनात मावेना, पाहा Video
तुझी शपथ भाई...रिंकू सिंग होता अस्वस्थ; कोहली ओरडलाही, आता आनंद गगनात मावेना, पाहा Video
Embed widget