थायलंडच्या 'त्या' ट्रिपचा 'सारा' खेळ सुशांतचाच!
रियाने सांगितल्यानुसार ही थायलंडची ट्रिप त्याने आपल्या मित्रांसोबत केली होती असं बोललं जातं. या ट्रिपमध्ये सगळे त्याचे मित्र होते. या ट्रिपवर तब्बल 70 लाख रूपये उडवले गेले होते. ही ट्रिप होती केवळ तीन दिवसांची.
मुंबई : सुशांत मृत्यूप्रकरणी सीबीआय तपास करत आहेच. काही दिवसांपूर्वी आलेल्या रिया चक्रवर्तीच्या मुलाखतीमध्येही तिने सुशांतबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यातली एक महत्वाची गोष्ट होती ती त्याच्या थायलंड ट्रीपची. ही ट्रीप त्याने डिसेंबर 2018 मध्ये केली होती. रियाच्या मुलाखतीत याबद्दल बोलताना तिने सांगितलं होतं की या ट्रिपवर त्याने 70 लाख खर्च केले होते. अशी ही ट्रिप होती कुणासाठी?
रियाने सांगितल्यानुसार ही थायलंडची ट्रिप त्याने आपल्या मित्रांसोबत केली होती असं बोललं जातं. या ट्रिपमध्ये सगळे त्याचे मित्र होते. या ट्रिपवर तब्बल 70 लाख रूपये उडवले गेले होते. ही ट्रिप होती केवळ तीन दिवसांची. या तीन दिवसांत सुशांतने आपल्या मित्रांवर 70 लाख रुपये खर्च केले. पण आता समोर आलेल्या माहीतीनुसार या ट्रिपमध्ये सगळे मित्र नव्हते. तर त्यात एक सुशांतची मैत्रीणही होती. केवळ त्याच मैत्रीणीसाठी सुशांतने स्पेशल विमान मागवलं होतं.
सुशांतचा एकेकाळचा सहाय्यक साबिर अहमदने या ट्रिपमध्ये कोणकोण होतं ते सांगितलं. या ट्रिमध्ये सुशांतसोबत होती त्याची केदारनाथ चित्रपटातली अभिनेत्री सारा अली खान. शिवाय, सिद्धार्थ गुप्ता, कुशल झवेरी, बॉडिगार्ड मुश्ताक, अब्बास आणि हा साहीरही त्या ट्रिपमध्ये होता. 30 डिसेंबरला ते थायलंडसाठी गेले आणि तीन दिवसांनी परत आले. साहीर म्हणतो, 'सारा मॅडम आणि सुशांत सिंह यांच्यात चांगली मैत्री होती. आम्हाला ते जाणवलं होतं. त्यांच्या प्रेम होतं की नाही ते सांगता येणार नाही. पण या ट्रिपमध्ये सारा आमच्यासोबत होती. खरंतर सारा थायलंडला येतेय हे कुणाला कळू नये अशी तिची इच्छा होती. म्हणूनन सुशांत सरांनी खासगी प्लेन घेतलं आणि संपूर्ण ट्रिप आम्ही फिरलो. आम्ही तिकडे एका बेटावर राहिलो होतो.'
रिया चक्रवर्तीने आपल्या मुलाखतीमध्ये सुशांतच्या या ट्रिपचा उल्लेख केला होता. पण त्यात सगळी मुलंच त्याच्यासोबत गेली होती असा तिने उल्लेख केला होता. पण त्यात सारा होती हा उल्लेख तिने केला नव्हता. आता हे तिला माहीत नव्हतं की तिने जाणूनबुजून ते लपवलं हा एक मुद्दा आहे.
महत्त्वाच्या बातम्या :'करण जोहर चित्रपट माफियांमधील मुख्य आरोपी', कंगनाचा हल्लाबोल, PM मोदींनाही केलं टॅग
सुशांतच्या डिप्रेशनची माहिती बहिणीला होती, सुशांत आणि प्रियंकामधील चॅट समोर!
...म्हणून रिया चक्रवर्तीची मीडिया प्रतिनिधींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
SSR Suicide Case | आज पुन्हा एकदा रियाच्या आई-वडिलांची चौकशी