(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...म्हणून रिया चक्रवर्तीची मीडिया प्रतिनिधींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीने मीडियाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीने मीडियाविरोधात तिच्या राहत्या घराच्या परिसरात गोंधळ घातल्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रियाने मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यामध्ये ती म्हणाली की, "मीडियाने माझ्या मार्गात येऊ नये आणि माझे घटनात्मक अधिकार लक्षात घेऊन काम करावं."
सीबीआयने सोमवारी रियाची जवळपास नऊ तास चौकशी केली. चौकशीनंतर रिया जेव्हा बाहेर पडली त्यावेळी अनेक माध्यम प्रतिनिधींनी तिच्याभोवती गराडा घातला. असचं काहीसं तिच्या घराजवळही झालं. तिच्या घराच्या बाहेर अनेक मीडिया प्रतिनिधी ती पोहोचण्याआधीच पोहोचले होते. हे सर्व पाहून ती पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि मीडिया प्रतिनिधींविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस स्टेशनच्या समोरही मीडिया प्रतिनिधी तिला प्रश्न विचारण्यासाठी गोळा झाले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना तिथून जाण्यास सांगितलं.
तक्रार दाखल केल्यानंतर रिया आपल्या घरी जाण्यासाठी रवाना झाली. दरम्यान, रिया चक्रवर्तीने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ रियाने आपल्या घराच्या खिडकीतून काढला होता. यामध्ये तिच्या घराबाहेर अनेक माध्यमांचे प्रतिनिधी तिचा बाईट घेण्यासाठी उभे होते. या व्हिडीओमध्ये तिचे वडील इंद्रजीत मुखर्जी देखील दिसून येत आहेत. जे घरी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारण्यासाठी गराडा घातला आहे.
कुटुंबियांच्या जीवाला धोका
रियाने व्हिडीओ शेअर करत लिहिलं होतं की, 'ही मी राहत असलेल्या बिल्डिंगचं कम्पाउंड आहे. या व्हिडीओमध्ये माझे वडील इंद्रजीत चक्रवर्ती (रिटायर आर्मी ऑफिसर) आहेत. आम्ही ईडी, सीबीआय आणि विविध चौकशी अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. मी आणि माझ्या कुटुंबियांचं आयुष्य धोक्यात आहे. आम्ही स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की, 'कृपया आम्हाला सुरक्षा द्या, जेणेकरून आम्हाला तपास यंत्रणांना पूर्णपणे मदत करता येईल.'
महत्त्वाच्या बातम्या :
राजपूत कुटुंबियांना उत्तरं द्यावीच लागतील, सुशांतच्या बहिणीला त्याच्या डिप्रेशनची कल्पना होती?
...तर चंबू गबाळ आवरुन आपल्या राज्यात जावं; संजय राऊतांकडून कंगनाचा समाचार
तापसी पन्नूला रियाबद्दल सहानुभूती, कायद्यावर विश्वास ठेवण्याचं केलं आवाहन