एक्स्प्लोर

सुशांतच्या डिप्रेशनची माहिती बहिणीला होती, सुशांत आणि प्रियंकामधील चॅट समोर!

रियाने सुशांतच्या गोळ्यांमध्ये बदल केल्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला, असा आरोप सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबीय सुरुवातीपासूनच करत होते. मात्र सुशांत आणि बहिण प्रियंका यांच्यातील चॅट समोर आलं आहे, ज्यावरुन तिला त्याच्या डिप्रेशनची माहिती होती, हे स्पष्ट होतं.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आणि त्याची बहीण प्रियंका यांच्यामध्ये 8 जून रोजी झालेलं चॅट समोर आलं आहे. व्हॉट्सअॅपवर झालेल्या या चॅटमध्ये प्रियंका सुशांतला लिब्रियम कॅप्सूल एका आठवड्यासाठी बंद करुन नेक्सिटो 10 mg गोळी सकाळी नाश्त्यानंतर घेण्यास सांगत आहे. तसंच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका सुशांतला लोनाझेप टॅबलेट सुद्धा इमर्जन्सीसाठी ठेवण्यास सांगत होती. जेणेकरुन एन्झायटीचा अटॅक जर आला तर त्यावेळी गोळ्या घेता येऊ शकतील.

या गोळ्या घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज असते आणि ही गोष्ट जेव्हा सुशांतने प्रियंकाला सांगितली तेव्हा तिने सुशांतला आपल्या एका परिचित डॉक्टरकडून प्रिस्क्रिप्शन घेऊन देण्याचं सांगितलं. तसंच हे नामवंत डॉक्टर असून मुंबईतील त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेण्यास ही मदत करेल, असं प्रियंकाने सुशांतला सांगितलं.

प्रियंकाने ज्या गोळ्या सुशांतला घेण्यास सांगितला त्यामध्ये लिब्रियम, नेक्सिटो 10 mg, लोनाझेप या गोळ्यांचा समावेश आहे.

सुशांतच्या डिप्रेशनची माहिती बहिणीला होती, सुशांत आणि प्रियंकामधील चॅट समोर!

नेमकं काय चॅट झालं सुशांत आणि प्रियंकामध्ये?

प्रियंका : एका आठवड्यासाठी लिब्रियम घे आणि त्याच्यानंतर नेक्सिटो 10 mg घे सकाळी नाश्त्यानंतर आणि लोनाझेप जवळ ठेव जर एन्झायटीचा अटॅक आला तर घे..

सुशांत : ok सोनू दी (sonu di)

सुशांत : पण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय या गोळ्या कोणी देणार नाहीत.

प्रियंका : थांब मी बघते काही करु शकते का?

Miss call

प्रियंका : बाबू कॉल मी, मला तुला प्रिस्क्रिप्शन पाठवायचं आहे.

प्रियंका : माझा मित्र एक नामांकित डॉक्टर आहे आणि मुंबईमध्ये त्याच्या चांगल्या ओळखीचे डॉक्टर आहेत, तुला जर दाखवायचे असेल तर आपण दाखवू आणि हे सर्व गुपित राहील काळजी करु नकोस..

प्रियंका : just called

प्रियंका प्रिस्क्रिप्शन पाठवते

प्रियंका : बाबू हे प्रिस्क्रिप्शन आहे..

प्रियंका : हे दिल्लीचं (प्रिस्क्रिप्शन) आहे पण काळजी नको, कोणी विचारलं तर सांग ऑनलाईन कन्सल्ट केलं म्हणून.

सुशांत : थँक्स सोना दी.

ही औषधं नेमकी का घेतली जातात?

लिब्रियम : लिब्रियम एक कृत्रिम निद्रा आणणारं औषध आहे. याचा उपयोग चिंता कमी करणे आणि एखाद्या व्यसनापासून जसं की दारु, ड्रग्स आणि इतर गोष्टींपासून लांब ठेवण्यासाठी केला जातो.

नेक्सिटो 10 mg : नेक्सिटो 10 मिलीग्राम टॅब्लेट उदासीनता आणि चिंता, पॅनिक डिसऑर्डर आणि वेड-बाध्यकारी डिसऑर्डरसारख्या इतर मानसिक आरोग्याच्या स्थितीवर उपचार करण्यासाठी लिहून दिले जाते. हा एक प्रकारचा अँटिडीप्रेससेंट आहे, ज्याला सेलेक्टिव्ह सेरोटोनिन रीपटेक इनहिबिटर (एसएसआरआय) म्हणून ओळखले जाते.

लोनाझेप टॅब्लेट : हे एक औषध आहे जे पॅनिक आणि चिंताग्रस्त डिसऑर्डरच्या उपचारांसाठी वापरले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर तरुण कुमार ज्यांनी हे प्रिस्क्रिप्शन दिलं ते दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात डॉक्टर आहेत आणि राजपूत कुटुंबियांचे मित्र आहेत. सुशांतच्या तब्येतीबद्दल माहिती घेऊनच त्यांनी हे प्रिस्क्रिप्शन दिलं.

तर रियाच्या वकिलांनी हे चॅट समोर आल्यानंतर आणि प्रश्न निर्माण झाले आहेत. सुशांतचे कुटुंबीय सुरुवातीपासूनच आरोप करत होते की रिया सुशांतच्या गोळ्यांमध्ये बदल करते आणि त्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला. मात्र या चॅटमुळे सुशांत ज्या गोळ्या घेत होता ते त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनाच दिल्याचे स्पष्ट झालं आहे.

तसेच रियाच्या वकिलांनी स्पष्ट केलं की, प्रियंकाला 2019 पासूनच सुशांतच्या तब्येतीबद्दल माहिती होती. मेंटल हेल्थ ऍक्टप्रमाणे डॉक्टरने पेशंटला न तपासता या गोळ्या दिल्या आहेत आणि सुशांतचा opd पेशंट म्हणून उल्लेख केला आहे जे चुकीचं आहे. कोरोनाच्या महामारीदरम्यान ऑनलाईन कन्स्ल्टेशनला परवानगी होती, मात्र सुशांतच्या बाबतीत असं प्रिस्क्रिप्शन देणं योग्य नव्हतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Embed widget