Rang Majha Vegla : दीपिका-कार्तिकीची मैत्री टिकवण्याच्या निमित्ताने दीपा-कार्तिकमध्ये पुन्हा फुलणार मैत्रीचं नातं!
Rang Maza Vegla : सध्या दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यात बरीच उलथापालथ होत आहे. आयेशामुळे या दोघांच्या नात्यात आणखी फूट पडली होती.
Rang Maza Vegla : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेत सध्या बरेच ट्विस्ट आणि कथेतील वळणं पाहायला मिळत आहेत. सौंदर्या इनामदारने बोल लगावल्यानंतर आता राधा आईच्या वागणुकीत बदल झाला आहे. इतकी वर्ष दीपाचा दुस्वास करणारी राधा आता तिची माफी मागून पुन्हा एकदा तिला इनामदारांच्या घरात परत आणणार आहे. श्वेताची काळजी घ्यायला दीपा इतकं जवळचं कुणीच नाही, असं म्हणत ती दीपाला इनामदारांच्या घरात घेऊन येणार आहे.
तर दुसरीकडे दीपा आणि कार्तिक पुन्हा एकदा जवळ येणार आहेत. सध्या दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यात बरीच उलथापालथ होत आहे. आयेशामुळे या दोघांच्या नात्यात आणखी फूट पडली होती. कार्तिकमुळे आपल्या आईला होणारा त्रास पाहून चिमुकली कार्तिकी देखील कार्तिकचा दुस्वास करू लागली आहे. याचा परिणाम आता दीपिका आणि कार्तिकीच्या मैत्रीवर देखील परिणाम होत आहे.
दीपिका-कार्तिकीत वाद!
कार्तिकी कार्तिकशी बोलत नसल्याने दीपिका आणि तिचे सतत खटके उडत आहेत. याची आता शाळेत आणि मैत्रिणींमध्ये देखील याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे शाळेच्या मॅडम दीपा आणि कार्तिकला बोलावून या संदर्भात विचारणा करतात. तर, या दोघींमधलं भांडण मिटवलं पाहिजे आणि पुन्हा त्यांचा समेट घडवून आणला पाहिजे, त्यांची मैत्री टिकवली पाहिजे, असं त्या म्हणतात. यासाठी दोघींना कुटुंबासारखं वातावरण मिळालं पाहिजे असं देखील सुचवतात. आता या निमित्ताने दीपा-कार्तिकमध्ये देखील मैत्री फुलणार आहे. दोघांच्या नात्यातील गैरसमज दूर होऊन आता ते पुन्हा एकत्र येतील का?, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील दीपा आणि डॉक्टर कार्तिकची जोडी प्रेक्षकांना भरपूर आवडली आहे. छोट्याशा कार्तिकी आणि दीपिकाने मालिकेत नवा ट्विस्ट तर आणलाच, पण आपल्या गोड निरागस अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा देखील मिळवली आहे.
हेही वाचा :
- Attack Poster : जॉन अब्राहमचा 'अटॅक' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नवे पोस्टर प्रदर्शित
- Rula Deti Hai Song Released : करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचे 'रुला देती है' गाणे रिलीज
- Pathaan : किंग इज बॅक, 'पठाण'च्या शूटिंगसाठी शाहरुख खान स्पेनला रवाना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha