Pathaan : किंग इज बॅक, 'पठाण'च्या शूटिंगसाठी शाहरुख खान स्पेनला रवाना
Shah rukh Khan : 'पठाण' सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचे शूटिंग स्पेनमध्ये होणार आहे.
Pathaan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh khan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहमचा (John Abraham) आगामी 'पठाण' (Pathaan) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे काही शूटिंग मुंबई आणि दुबईमध्ये झाले आहे. आता उरलेले शूटिंग पूर्ण करण्यासाठी शाहरुख स्पेनला रवाना झाला आहे.
सिद्धार्थ आनंद 'पठाण' सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख बऱ्याच दिवसांनी कमबॅक करत आहे. स्पेनमधील माद्रिदच्या स्टेडियमध्ये सिनेमातील अॅक्शन सीन्सचे शूटिंग होणार आहे. तसेच शाहरुख आणि दीपिकाच्या एका गाण्याचे शूटिंगदेखील स्पेनमध्येच होणार आहे.
View this post on Instagram
'पठाण' सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख आणि दीपिकाची जोडी 'ओम शांती ओम' आणि 'चेन्नई एक्सप्रेस' सिनेमात दिसली होती. आता 'पठाण' सिनेमात या जोडीला पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या
Salman Khan : भाईजानने केले लग्न? सलमान खानने व्हिडीओ शेअर करत केला खुलासा
Box Office Report : सिनेसृष्टीला सुगीचे दिवस, सिनेमांची बॉक्सऑफिसवर उत्तुंग भरारी
Jhund Box Office Collection Day 1: नागराज मंजुळेंच्या 'झुंड'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन, पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
