Attack Poster : जॉन अब्राहमचा 'अटॅक' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नवे पोस्टर प्रदर्शित
John Abraham : जॉन अब्राहमने अलीकडेच 'अटॅक' सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
Attack Poster : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा (John Abraham) 'अटॅक' (Attack) सिनेमा 1 एप्रिल 2022 रोजी जगभरात प्रसिद्ध होणार आहे. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. जॉन अब्राहमने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान सिनेमाचे नवे पोस्टरदेखील प्रदर्शित झाले आहे.
जॉन अब्राहमने 'अटॅक' सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमध्ये जॉन अब्राहम अॅक्शन मूडमध्ये दिसत आहे. जॉन अब्राहमच्या या लूकवर चाहते कमेंट्स करत आहेत. 'अटॅक' सिनेमाचे दिग्दर्शन राज आनंदने केले आहे. या सिनेमात जॉन अब्राहमसह जॅकलीन फर्नांडिस आणि रकुलप्रीत सिंहदेखील दिसणार आहे.
View this post on Instagram
'अटॅक' सिनेमा 28 जानेवारी 2022 रोजी रिलीज होणार होता. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. पण आता हा सिनेमा 1 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Salman Khan : भाईजानने केले लग्न? सलमान खानने व्हिडीओ शेअर करत केला खुलासा
Box Office Report : सिनेसृष्टीला सुगीचे दिवस, सिनेमांची बॉक्सऑफिसवर उत्तुंग भरारी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha