(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Spider Man : बॉक्स ऑफिसवर 'स्पायडर मॅन'चा धुमाकूळ, चार दिवसात 100 कोटी क्लबमध्ये दाखल
Spider Man : केवळ चार दिवसात स्पायडरमॅननं 100 कोटींचा पल्ला गाठला आहे.
Spider-Man : No Way Home : जगभरात 'स्पायडर मॅन' सिनेमाची चर्चा सुरू आहे. हॉलीवूडचा स्पायडर मॅन 100 कोटी क्लबमध्ये समावेश झाला आहे. सलमान, अक्षय आणि आमिर खान करतात ते हॉलीवुडच्या स्पायडरमॅनने करून दाखवलंय. कोरोनाची भीती असताना बॉलीवूड नायकांचे चित्रपट तिकीट खिडकीवर गर्दी करण्यास अयशस्वी ठरले असताना स्पाडरमॅननं मात्र प्रेक्षकांना खेचून घेण्यात यश मिळवलं आहे. भारतात चार भाषांमध्ये रिलीज झालेल्या स्पायडर मॅन- नो वे होम चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 32 कोटींचा व्यवसाय केला होता. केवळ चार दिवसात स्पायडरमॅननं 100 कोटींचा पल्ला गाठला आहे.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार स्पायडर मॅन- नो वे होमनं रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी 29 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. गुरुवारी 32.75 कोटी, शुक्रवारी 20 कोटी, शनिवारी 26.25 कोटी रुपयांचा व्यवसाय करून चित्रपटानं एकूण 108 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. स्पायडरमॅनची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अशीच कायम राहिली तर अॅव्हेंजर्स, अवतार आणि जुरासिक पार्कपेक्षा जास्त व्यवसाय करणारा हा चित्रपट ठरेल यात शंका नाही.
स्पायडर मॅन : नो वे होम' हा चित्रपट 16 डिसेंबरला भारतात प्रदर्शित झाला असून यूएस थिएटरमध्ये हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. जॉन वॉट्सने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे स्पायडर मॅनच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली असून हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये जात आहेत. या सिनेमातील टॉम हॉलंडच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या