Premiere of Spider-Man No Way Home : स्पायडर मॅनच्या प्रीमियरनंतर Tom Holland भावूक; व्हिडीओ व्हायरल
स्पायडर मॅन : नो वे होम (Spider-Man: No Way Home Trailer) या चित्रपटाचा प्रीमियर शो सोमवारी (13 डिसेंबर) Los Angeles येथे पार पडला.
![Premiere of Spider-Man No Way Home : स्पायडर मॅनच्या प्रीमियरनंतर Tom Holland भावूक; व्हिडीओ व्हायरल tom holland breaks down after spider man no way home premiere Premiere of Spider-Man No Way Home : स्पायडर मॅनच्या प्रीमियरनंतर Tom Holland भावूक; व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/16/c6efe16888a9d3f385decb4d6cb94093_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Premiere of Spider-Man No Way Home : स्पायडर मॅन : नो वे होम (Spider-Man: No Way Home Trailer) या चित्रपटाचा प्रीमियर शो सोमवारी (13 डिसेंबर) Los Angeles येथे पार पडला. या प्रीमियरला चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली होती. प्रीमियर शोला अभिनेता टॉम हॉलंड (tom holland), झेंडाया (Zendaya ) आणि इतर कलाकार उपस्थित होते. रेड कार्पेटवर या कलाकारांनी वॉक केला. प्रीमियर शो झाल्यानंतर अभिनेता टॉम हॉलंडला भेटण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली. यावेळी चाहत्यांना भेटताना टॉम भावूक झाला.
स्पायडर मॅन : नो वे होमचा (Spider-Man: No Way Home Trailer) या चित्रपटात टॉम हॉलंडने प्रमुख भूमिका म्हणजेच स्पायडर मॅनची भूमिका साकारली आहे. स्पायडर मॅन : नो वे होमचा या चित्रपटाच्या प्रीमियर शोनंतर टॉम भावूक झाला. त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रीमियर शोचा व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये टॉमला अश्रू अनावर झालेले दिसत आहे. एका चाहत्याने टॉमचा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'टॉमला भावूक होताना पाहून त्याच्या चाहत्यांना वाईट वाटत आहे. '
Tom Holland was crying after the screening of ‘Spider-Man:No Way Home’ 🥺❤️#spidermannowayhome pic.twitter.com/4Q1MciVYqx
— Jisan (@Jisan431) December 14, 2021
स्पायडर मॅन : नो वे होम हा चित्रपट आज (16 डिसेंबर) भारतात प्रदर्शित झाला असून यूएस थिएटरमध्ये हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या
Kiara Advani : कियारा आडवाणीची नवी लग्झरी कार; किंमत ऐकलीत तर व्हाल अवाक्
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)