एक्स्प्लोर
Advertisement
एस. पी बालसुब्रमण्यम व्हेंटिलेटरवरच... प्रकृती स्थिर असल्याची रुग्णालयाची माहिती
ज्येष्ठ गायक एस. पी बालसुब्रमण्यम सध्या व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या तब्येतीविषयी मेडिकल बुलेटिन हॉस्पिटलने नुकतंच प्रसिद्ध केलं आहे.
चेन्नई : एस.पी. बालसुब्रमण्यम हे नाव भारतीय संगीतसृष्टीला अपरिचित नाही. तेलुगु, तामिळ, कन्नड, हिंदी अशा तब्बल 40 हजार पेक्षा जास्त गाण्यांसाठी त्यांनी आवाज दिला आहे. एस.पी. बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाली असून चेन्नईतल्या एमजीएम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या तब्येतीविषयी मेडिकल बुलेटिन हॉस्पिटलने नुकतंच प्रसिद्ध केलं आहे.
एस.पी बालसुब्रमण्यम हे सध्या व्हेंटिलेटरवरच असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रूग्णालयाने कळवलं आहे. एस.पी. बालसुब्रमण्यम यांना आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यावर त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आला होता. पण काही दिवसांनी तो काढण्यात आल्याची माहीती त्यांची बहीण व प्रसिद्ध गायिका एस.पी.शैलजा यांनी दिली होती. ही माहिती आल्यावर दुसऱ्याच दिवशी त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटर लावल्याचं रुग्णालयाने जाहीर केलं.
Trailer | विकास दुबेच्या जीवनावर आधारित सिनेमाच ट्रेलर रिलीज
त्यामुळे एस.पी यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची धाकधुक सुरू होती. सध्या त्यांचा व्हेंटिलेटर काढण्यात आलेला नाही. तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालय सांगतं. त्यांच्या तब्येतीबद्दल त्यांच्या कुटुंबियांना वारंवार माहीती दिली जात असून अनुभवी डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत, असंही हॉस्पिटल सांगत.
एस.पी. बालसुब्रमण्यम हे पद्मश्री, पद्मभूषण किताबाचे मानकरी आहेत. हम आपके है कौन, एक दुजे के लिये, पत्थर के फुल, मैने प्यार किया, रोजा, हम से है मुकाबला आदी अनेक हिंदी सिनेमांसाठी त्यांनी गायन केलं आहे. 2013 मध्ये आलेल्या चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटासाठीही त्यांनी गायन केलं आहे. जवळपास 15 वर्षांनी त्यांनी या निमित्ताने हिंदी गायन केलं आहे.
Sushant Singh Case | सुशांतचा लॅपटॉप आणि मोबाईल CBI च्या ताब्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement