Trailer | विकास दुबेच्या जीवनावर आधारित सिनेमाच ट्रेलर रिलीज
सिनेमात प्रकाश दुबेची भूमिका साकारणारा अभिनेता हुबेहुब विकास दुबे सारखाच दिसत आहे. अभिनेता प्रमोद विक्रम सिंह सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे.

मुंबई : उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारला गेलेला गुंड विकास दुबे याच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'प्रकाश दुबे कानपूर वाला' असं या सिनेमाचं नाव आहे. गोल्डन बर्ड पिश्चर्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमात प्रकाश दुबेची भूमिका साकारणारा अभिनेता हुबेहुब विकास दुबे सारखाच दिसत आहे. अभिनेता प्रमोद विक्रम सिंह सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे.
दुसरा गँगस्टर अमर दुबे सिनेमात समर नावाची भूमिका साकारत आहे. सिनेमात त्याचीही मोठी भूमिका असणार असल्याचं ट्रेलरमधून दिसत आहे. सिनेमात दोन्ही गँगस्टरचा एन्काऊंटर नाही तर पोलिसांकडून ठरवून त्यांना मारल्याचं दाखवण्यात आलं आहे. सिनेमाचं दिग्दर्शन आकाश सिंह गहरवारने केलं आहे. याआधी विकास दुबेवर वेब सीरिजची निर्मित करणार असल्याचं प्रसिद्ध सिनेनिर्माते हंसल मेहता यांनी सांगितलं होतं.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















