एक्स्प्लोर

Sidhu Moose Wala Song: सिद्धू मूसेवालांचे ‘SYL’ गाणे रिलीज, काही वेळातच मिळाले मिलिअन व्ह्यूज!

Sidhu Moose Wala Song: दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांचे 'SYL' गाणे रिलीज झाले आहे.

Sidhu Moose Wala Song: दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांचे 'SYL' गाणे रिलीज झाले आहे. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर तब्बल 26 दिवसांनी त्यांचे नवीन गाणे रिलीज झाले आहे, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सिद्धू मूसेवाला यांचे SYL हे गाणे सध्या यूट्यूबवर ट्रेंड करत आहे. सोशल मीडिया युझर्स हे गाणे मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. गाणे ऐकून कॉमेंट सेक्शनमध्ये दिवंगत गायकाची आठवण काढत आहेत. ‘SYL’मध्ये सिद्धू यांनी सतलज-यमुना लिंक (SYL) कालव्याचा उल्लेख केला आहे

सिद्धू मूसेवालांचे हे गाणे 4 मिनिटे 9 सेकंदाचे आहे, जे चाहत्यांना खूप आवडत आहे. या गाण्यात पंजाबचे पाणी आणि त्याच्याशी संबंधित इतर समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यासोबत पंजाब-हरियाणा यांच्यातील बहुचर्चित सतलज-यमुना लिंक (SYL) कालव्याच्या वादाचा उल्लेख करून, तो सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाण्याच्या सुरूवातीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे हरियाणाचे प्रभारी सुशील गुप्ता यांचे विधान ऐकू येते. ज्यामध्ये ते पंजाबप्रमाणे हरियाणात 2024 मध्ये त्यांच्या पक्षाचे सरकार बनल्यास एसवायएलचे पाणी हरियाणाला मिळण्याबाबत बोलत आहेत. याशिवाय पंजाब आणि पंजाबींचा अभिमानही गाण्यात दाखवण्यात आला आहे.

पाहा गाणे :

सिद्धू मूसेवालाचे SYL हे गाणे हिट झाले आहे. रिलीजच्या अवघ्या काही तासांतच या गाण्याला सुमारे 6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर हे गाणे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. सिद्धू मूसेवालांचे हे गाणे त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याच्या कमेंट सेक्शनमध्ये, चाहते सिद्धू यांच्या आठवणीकाढत भरपूर कमेंट करत आहेत. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, सिद्धू त्यांच्या दमदार गाण्यांनी नेहमीच चाहत्यांच्या मनात जिवंत राहतील.

दर 5 ते 6 महिन्यांनी एक गाणे रिलीज होणार!

सिद्धू मुसेवाला यांच्या अरदासच्या वेळी त्यांच्या वडिलांनी सिद्धूला गाण्यांच्या माध्यमातून कायम जिवंत ठेवणार असल्याचे सांगितले होते. सिद्धूचे वडील बलकौर सिंह म्हणाले होते की, ते दर 5-6 महिन्यांनी सिद्धूचे एक गाणे रिलीज करतील, जेणेकरून सिद्धूची सगळी गाणी पुढील 5-7 वर्षे रिलीज होत राहतील आणि ते लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहतील. 29 मे 2022 रोजी संध्याकाळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

Sidhu Moose wala Birthday: शुभदीप सिंह सिद्धूचा सिद्धू मुसेवाला बनण्यापर्यंतचा प्रवास! गाण्यांनी जिंकलं होतं प्रेक्षकांचं मन

Sidhu Moose Wala Case : इंटरपोलकडून गोल्डी ब्रारविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी , सिद्धू मूसवालाच्या हत्येची स्वीकारली होती जबाबदारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखं पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखं पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
Madhya Pradesh High Court : 'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरला मदत पुरवणारे ही पोलिसांच्या रडारवर; तपासात चंद्रपूरच्या सट्टा व्यावसायिकासह अनेकांची नावं आली समोर   
प्रशांत कोरटकरला मदत पुरवणारे ही पोलिसांच्या रडारवर; तपासात चंद्रपूरच्या सट्टा व्यावसायिकासह अनेकांची नावं आली समोर   
Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ, सोनं 91000 रुपयांजवळ, 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?
सोन्याच्या दरात वाढ सुरुच, सोनं 91000 रुपयांजवळ पोहोचलं, दरवाढीची कारणं जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 28 March 2025Prashant Koratkar Attack News : कोल्हापूर कोर्टात वकिलाकडून प्रशांत कोरटकरवर हल्ला, सुनावणीनंतर कोरटकरला कोठडीकडे नेताना हल्लाPrashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरला न्यायालयाचा झटका, आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडीत वाढABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 AM 28 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखं पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखं पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
Madhya Pradesh High Court : 'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरला मदत पुरवणारे ही पोलिसांच्या रडारवर; तपासात चंद्रपूरच्या सट्टा व्यावसायिकासह अनेकांची नावं आली समोर   
प्रशांत कोरटकरला मदत पुरवणारे ही पोलिसांच्या रडारवर; तपासात चंद्रपूरच्या सट्टा व्यावसायिकासह अनेकांची नावं आली समोर   
Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ, सोनं 91000 रुपयांजवळ, 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?
सोन्याच्या दरात वाढ सुरुच, सोनं 91000 रुपयांजवळ पोहोचलं, दरवाढीची कारणं जाणून घ्या
Thailand, Bangkok, Earthquake : अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, शक्तीशाली भूकंपाने बँकाॅकमध्ये हाहाकार
Video : अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, शक्तीशाली भूकंपाने बँकाॅकमध्ये हाहाकार
कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
Mumbai Couple Crime Bengaluru: एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, लग्नासाठी जगाशी दोन हात केले, पण बंगळुरुत राकेश-गौरीच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत
एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, लग्नासाठी जगाशी दोन हात केले, पण बंगळुरुत राकेश-गौरीच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत
Ajit Pawar : बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही, बाकीच्यांचा घास नाही घास....; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही, बाकीच्यांचा घास नाही घास....; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
Embed widget