एक्स्प्लोर

Sarja : 'सर्जा'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज; लवकरच सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sarja : 'सर्जा' या मराठी सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Sarja Marathi Movie : 'सर्जा' (Sarja) या मराठी सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमातील गाणी काही दिवसांपूर्वीच संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. 'जीव तुझा झाला माझा', 'धड धड...' आणि 'संगतीनं तुझ्या' ही सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता या सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज झाला आहे. 

'सर्जा' सिनेमाची झलक दाखवणाऱ्या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावरदेखील या सिनेमाचा ट्रेलर चर्चेत आहे. 'सर्जा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा धनंजय खंडाळे यांनी सांभाळली आहे. या सिनेमातील नायक-नायिकेच्या जोडीची अनोखी केमिस्ट्री रसिकांना आकर्षित करणारी ठरणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रोहित चव्हान आणि ऐश्वर्या भालेराव ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'सर्जा' या सिनेमाचं वैशिष्ट्य काय आहे?  

'सर्जा' ही रोमॅंटिक लव्हस्टोरी असली तरी यात समाजातील विविध घटक आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या मुद्द्यांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केल्याचं पहायला मिळणार आहे. प्रेमाचे विविध पैलू, प्रेमाचे बदलत रंग, प्रेमाच्या नाना छटा आणि कठीण प्रसंगांमध्येही खुलून येणारं खरं प्रेम हे 'सर्जा' या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. 

'सर्जा'बद्दल दिग्दर्शक धनंजय खंडाळे म्हणाले...

'सर्जा' सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक धनंजय खंडाळे म्हणाले की,"आजवर बऱ्याच प्रेमकथा मोठ्या पडद्यावर आल्या असल्या तरी 'सर्जा'ची कथा खऱ्या अर्थाने अनोखी वाटावी अशी आहे. प्रेम ही एक अशी भावना आहे जी कोणत्याही बंधनात बांधता येऊ शकत नाही. कितीही संकटं आली तरी त्यावर मात करण्याची शक्ती प्रेमात असते". 'सर्जा' सिनेमाची कथा प्रेमाची नवी व्याख्या मांडणारी असून, संगीताच्या माध्यमातून रसिकांच्या मनात घर करणारी ठरेल अशी आशा खंडाळे यांनी व्यक्त केली". 

'सर्जा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्यासोबत धनंजय यांनी या सिनेमाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि गीतलेखनही केलं आहे. मराठीतील आघाडीच्या कलाकारांसह नवोदित कलाकारांची निवड केली जाणं हे 'सर्जा' या सिनेमाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. या सिनेमाद्वारे जुन्या आणि नव्या कलाकारांच्या अभिनयाचा सुरेख संगम घडवण्यात आला आहे. 

14 एप्रिलला 'सर्जा' येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

अनिल नगरकर, तुषार नागरगोजे, आकाश पेटकर, ज्योती शेतसंधी, जगन्नाथ घाडगे, विष्णू केदार, प्रशांत पिसे, बालकलाकार गौरी खंडाळे, कुणाल गायकवाड, सानिया मुलानी हे कलाकार 'सर्जा' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा येत्या 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सर्जा' नावाचा सिनेमा याआधीदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अजिंक्य देव मुख्य भूमिकेत होते. त्यावेळी हा सिनेमा चांगलाच गाजला. आजही सिनेरसिक आवडीने तो सिनेमा पाहतात. 

ट्रेलर पाहा : 

संबंधित बातम्या

Sarja Movie Song: आदर्श शिंदेचं 'धड धड...' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस; सर्जा 'या' दिवशी होणार रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari EXCLUSIVE : Sanjay Rathod,Tanaji Sawant,Sandipan Bhumre;मिटकरींच्या टार्गेटवर Shiv SenaPune Crime CCTV : स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार, घटनेपूर्वीचा CCTV 'माझा'च्या हातीPune Crime News : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर बसमध्ये पहाटे बलात्कारPune Crime Case Swargate : 'शिवशाही' बसमध्ये तरुणीवर अत्याचार!  पुण्यातील घटनेची A टू Z कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Pune Crime swargate st depot: पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
Lehenga Controversy Wedding : कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
Embed widget