एक्स्प्लोर

Sarja Movie Song: आदर्श शिंदेचं 'धड धड...' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस; सर्जा 'या' दिवशी होणार रिलीज

'सर्जा' (Sarja) या चित्रपटातील 'धड धड...' (Dhad Dhad) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 'सर्जा' हा चित्रपट 14 एप्रिलला रिलीज होणार आहे.

Sarja Movie Song: 'सर्जा' (Sarja) या चित्रपटातील 'जीव तुझा झाला माझा...' हे काही दिवसांपूर्वी संगीतप्रेमींच्या भेटीला आलेलं गाणं चांगलंच गाजत आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव होत असताना 'सर्जा'मधील 'धड धड...' (Dhad Dhad) हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अबालवृद्धांना ताल धरायला लावणाऱ्या या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल. 

राजवर्धन फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या 'सर्जा'ची निर्मिती अमित जयपाल पाटील यांनी केली असून, रमेश रंगराव लाड या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीतप्रधान 'सर्जा' चित्रपटाचं दिग्दर्शन धनंजय मनोहर खंडाळे यांनी केलं आहे. या चित्रपटातील 'धड धड...' हे दमदार गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. दिग्दर्शक धनंजय खंडाळे यांनीच लिहिलेलं हे गाणं संगीतकार हर्षित अभिराज यांनी स्वत: आदर्श शिंदेच्या साथीनं गायलं आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला क्षणार्धात ठेका धरायला लावण्याची क्षमता 'धड धड...'मध्ये असल्याचं गाणं पाहिल्यावर तसंच ऐकल्यावर वाटतं. रात्रीच्या वेळी चित्रीत करण्यात आलेलं 'धड धड...' खऱ्या अर्थानं मनाची धड धड वाढवणारं आहे. याबाबत हर्षित अभिराज म्हणाले की, एका सुमधूर ट्यूनवर दिग्दर्शक धनंजय खंडाळे यांनी 'धड धड...' हे गाणं लिहिलं आहे. गाण्यातील शब्दरचना ट्यूनला चपखल बसल्याने एक सुरेल गाणं रसिकांच्या सेवेत सादर करण्याची संधी मिळाली. आदर्श शिंदेच्या आवाजानं या गाण्यात एक वेगळाच रंग भरला आहे. आदर्शसोबत हे गाणं गाताना एक वेगळंच समाधान लाभलं. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण जग या गाण्याच्या तालावर थिरकणार असल्याचंही हर्षित अभिराज म्हणाले. हे गाणं 'सर्जा'च्या आकर्षणाचं मुख्य केंद्र ठरणारं असल्याचं अगोदरपासूनच ठाऊक होतं आणि हर्षित अभिराज यांनी त्याच तोलामोलाचं गाणं बनवल्याची भावना दिग्दर्शक धनंजय खंडाळे यांनी व्यक्त केली आहे. 'धड धड...' हे गाणं मराठी रसिकांची धड धड वाढवणारं ठरेल आणि संगीतप्रेमी या गाण्यावर भरभरून प्रेम करतील असे निर्माते अमित पाटील यांचे म्हणणे आहे. 
 

अनिल नगरकर, रोहित चव्हाण, तुषार नागरगोजे, ऐश्वर्या भालेराव, आकाश पेटकर, ज्योति शेतसंधी, जगन्नाथ घाडगे, विष्णू केदार, प्रशांत पिसे, बालकलाकार गौरी खंडाळे, कुणाल गायकवाड आदी कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. दिग्दर्शन आणि गीतलेखनासोबतच धनंजय खंडाळे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखनही केलं आहे. संगीतासोबतच पार्श्वसंगीतही हर्षित अभिराज यांचं आहे. डिओपी राहुल मोतलिंग यांनी सुरेख सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन सुबोध नारकर यांनी केलं आहे. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी प्रशांत प्रल्हाद शिंदे यांनी सांभाळली असून सुनील लोंढे यांचं कला दिग्दर्शन आहे. 14 एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Sarja: 'सर्जा' चं पोस्टर प्रदर्शित; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Wagh Case: सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
Pune New Year Celebration : पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
Kashmir: काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 31 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 31 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दीRajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं  चित्र कोण रंगवतयं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Wagh Case: सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
Pune New Year Celebration : पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
Kashmir: काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
Nashik Nandgaon Fog : नांदगाववर पसरली दाट धुक्याची चादर, अवकाळीनंतर धुक्याने बळीराजा हवालदिल, पाहा Photos
नांदगाववर पसरली दाट धुक्याची चादर, अवकाळीनंतर धुक्याने बळीराजा हवालदिल, पाहा Photos
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
Sharad Ponkshe: द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Sharad Ponkshe : द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad: वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
Embed widget