Salman Khan Sister Arpita Story : अशी झाली होती सलमानची बहिण अर्पिताची खान कुटुंबामध्ये एन्ट्री; सलमानसाठी आहे लकी चार्म
अलवीरा आणि अर्पिता या सलमानच्या बहिणी आहेत तसेच सलमानला दोन भाऊ देखील आहे.
Salman Khan Sister Arpita Story : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. अलवीरा आणि अर्पिता या सलमानच्या बहिणी आहेत तसेच सलमानला दोन भाऊ देखील आहे. सलमान अनेक वेळा कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. सलमान आणि त्याची बहिण अर्पिता यांचे नाते खास आहे. जाणून घेऊयात सलमानची बहिण अर्पिताची खान कुटुंबात कशी एन्ट्री झाली.
सलमानचे वडिल सलिम खान हे दररोज मर्निंग वॉकला जातात. एकेदिवशी मर्निंग वॉकला जाताना त्यांचे लक्ष एका महिलेकडे गेले. त्या महिलेसोबत एक लहान मुलगी देखील होती. एका रिपोर्टनुसार, ती महिला भिक मागत होती. सलिम खान यांना त्या महिलेची मदत करायची होती. काही दिवसानंतर त्या रस्त्यावरील महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या महिलेसोबत राहणारी लहान मुलगी रस्त्यावर रडत उभी होती. त्यावेळी त्या मुलीला सलिम यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. ती लहान मुलगी म्हणजे अर्पिता खान. सलिम यांनी अर्पिताला घरी आणले. खान कुटुंबाने तिचे आनंदाने स्वागत केले होते. सलमान अर्पिताला त्याची लकी चार्म मानतो.
View this post on Instagram
अभिनेता आयुष शर्मा आणि अर्पिताने 2014 मध्ये लग्नगाठ बांधली. नुकताच आयुष शर्माचा ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये सलमानने प्रमुख भूमिका सकारली आहे.
संबंधित बातम्या
Vicky - Katrina Wedding : आली समीप लग्नघटीका, विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाची लगीनघाई सुरू