Vicky - Katrina Wedding : आली समीप लग्नघटीका, विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाची लगीनघाई सुरू
Vicky - Katrina Wedding : विकी कौशल आणि कतरिना कैफचा लग्नसोहळा 7 ते 9 डिसेंबर दरम्यान राजस्थानमध्ये पार पडणार आहे.
Vicky - Katrina Wedding : राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यात असलेल्या सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे बॉलिवूड स्टार विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) चा लग्नसोहळा पार पडणार आहे. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याची जबाबदारी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर सोपवण्यात आली आहे.
वधू-वरांसाठी भव्य हॉटेलमध्ये खास खोलीची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. विकी 'राजा मानसिंग' खोलीत राहणार आहे. तर कतरिना राणी पद्मावती खोलीमध्ये राहणार आहे. हॉटेलमधील या दोन्ही सर्वात महागड्या खोली आहेत. एका रात्रीचा या महागड्या खोलीचा दर 7 लाख रुपये आहे.
हॉटेलमध्ये 7 लाख रुपये एका रात्रीचा दर असणाऱ्या दोन खास खोल्या आहेत. तर तर 4 लाख रुपये एका रात्रीचा दर असणाऱ्या 15 खोल्या आहेत. उर्वरित खोल्यांसाठी एका रात्रीचे शुल्क प्रति खोली 1 लाख आहे. संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, लोकांवर काही निर्बंधदेखील लादण्यात आले आहेत.
View this post on Instagram
लग्नाची तयारी सहा वेगवेगळ्या विक्रेत्यांकडे सोपवण्यात आली आहे. ते फुले, सजावट, सुरक्षा, वाहतूक, खाद्यपदार्थ आणि जंगल सफारीची व्यवस्था करणार आहेत. लग्नाचे कार्यक्रम 4 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. हिंदू रितीरिवाजांनुसार हे दोघे 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. 7 डिसेंबर रोजी 'संगीत' सोहळा होणार असून 8 डिसेंबरला 'मेहंदी' सोहळा होणार आहे. 10 डिसेंबरला लग्नसोहळ्यानंतर खास रिसेप्शन होणार आहे.
संबंधित बातम्या
Omicron : ओमिक्रॉन व्हेरियंटचा विकी-कतरिनाच्या लग्नाला फटका, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
OTT Upcoming Web Series : Aarya 2 पासून Mirzapur 3 पर्यंत या वेबसीरिजची प्रेक्षक पाहत आहेत आतुरतेने वाट
Bigg Boss 15 : Rakhi Sawant आणि Abhijit Bichukale चा 'बिग बॉस'मध्ये दिसणार जलवा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha