सलमान खानचं फार्महाऊस म्हणजे अय्याशीचा अड्डा? भाईजानने थेट सांगून टाकलं, म्हणाला...
Salman Khan : सलमान खानला फावला वेळ मिळाला की तो फार्महाऊसवर राहायला जातो. लॉकडाऊनच्या काळात तो फार्महाऊसवरच राहात होता.
मुंबई : बॉलिवुडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. त्याच्या सिकंदर या चित्रपटाचे टिझर लॉन्च होणार होते. मात्र आता ही लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपटाचं शूटिंग झालं किवा मोकळा वेळ घालवायचा असेल तर सलमान खान त्याच्या फार्म हाऊसवर जातो. तिथे तो निवांत वेळ घावलतो. या फार्म हाऊसचे काही फोटो समोर आलेले आहेत. त्यामुळेच सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये नेमकं काय चालत असेल? असा प्रश्न अनेकांना पडतो. यावरच सलमान खानने प्रतिक्रिया दिली होती.
निवांत वेळ भेटला की सलमान फार्महाऊसमध्ये जातो
सलमान खानचे हे फार्महाऊस एकूण 150 एकरच्या परिसरात वसलेले आहे. येथे सलमान खान निवांत वेळ घालवतो. सलमान खान त्याचा भाऊ अभिनेता अरबाज खानच्या एका पॉडकास्टमध्ये आला होता. याच पॉडकास्टामध्ये अरबाज खानने सलमानला या फार्महाऊसबद्दल सविस्तर विचारले होते. विशेष म्हणजे सलमान खाननेदेखील या फार्महाऊसबद्दल सविस्तर माहिती दिली होती. अनेकांना वाटते की सलमान ज्या फार्म हाऊसमध्ये राहायला जातो, तो त्याच्या स्वत:च्या मालकीचा आहे. मात्र खरं पाहायचं झाल्यास त्या फार्महाऊसची मालकी सलमान खानची बहीण अर्पिताकडे आहे. म्हणजेच तो फार्महाऊस अर्पिताचा आहे.
आमच्या कुटुंबात 250 ते 300 लोक
पॉडकास्टमध्ये अरबाज खानने सलमान खानला त्याच्या चाहत्यांच्या काही कमेंट्स वाचून दाखवल्या होत्या. एका चाहत्याने सलमान खानच्या फार्महाऊसला जिल्हा घोषित करा. ते फा मोठे आहे, असे मस्करीमध्ये म्हटले होते. तर सलमानचे हे फार्महाऊस नसून ते अय्यासीचा अड्डा आहे. तिथे मौज-मजा चालते, असे एका व्यक्तीने म्हटले होते. यालाच सलमान खानने छान आणि समर्पक उत्तर दिले. आमच्या कुटुंबात एकूण 250 ते 300 लोक आहेत. सगळेच त्या फार्म हाऊसला भेट देतात. त्यामुळे त्या फार्म हाऊसला जिल्हा घोषित करण्यात काही अडचण नाही, असे मिश्किल उत्तर सलमान खानने दिले होते.
View this post on Instagram
...तर वडील मला गोळी मारतील
तसेच, मी या फार्महाऊसमध्ये असतानाचे काही फोटो अपलोड केलेले आहेत. हे फोटो वर्कआऊट करतानाचे, शेतात काम करतानेचच आहेत. त्यामुळे या फार्महाऊसमध्ये अय्याशी होते, हा समज चुकीचा आहे. तसं जर झालं तर आपले वडील (अरबाज खानला उद्देशून) आपल्याला गोळी मारतील, असे मिश्की उत्तर सलमान खानने दिले होते. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात सलमान खानने याच फार्महाऊसमध्ये एक गाणे शूट केले होते.
हेही वाचा :
Sikandar Teaser : सलमान खानच्या 'सिकंदर'चे टिझर रिलीज लांबणीवर, आता नेमकं कधी प्रदर्शित होणार?
बापरे बाप! अनन्या पांडेच्या आलिशान महलाचं गौरी खानशी खास नातं, घराचे फोटो पाहून व्हाल थक्क!