Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
Saif Ali Khan Attacker First Footage: सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात मध्यरात्री एक चोर घुसला आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर सर्वात आधी सैफिनाच्या मुलांच्या खोलीत गेला.
Saif Ali Khan Attacker First Footage: सैफ अली खानवर (Saif Ali Khan) गुरुवारी रात्री घरात घुसून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. घरात शिरून घुसखोरानं केलेल्या हल्ल्यात सैफ अली खानच्या मणक्याला गंभीर दुखापत (Severe Spinal Injury) झाली होती. तसं पाहायला गेलं तर, वांद्रे परिसरात राहणाऱ्या सैफ आणि करिनाच्या (Kareena Kapoor Khan) बाराव्या मजल्यावर असलेल्या घरात घुसणं तसं अशक्य होतं. हायप्रोफाईल एरियात घर, आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेजचं जाळं, इमारतीभोवती सुरक्षारक्षकांचा वेढा, एवढं सगळं असूनही चोरानं अगदी सहज इमरतीच्या आवारात प्रवेश मिळवला आणि थेट सैफिनाच्या घरात जाऊन पोहोचला. दरम्यान, या घटनेमुळे सध्या अवघी इंडस्ट्री हादरली आहे. अशातच आता सैफ अली खानला भोसकणाऱ्या चोराचा पहिला फोटो समोर आला आहे आणि तो नेमका कुठून घरात शिरला? हेदेखील समोर आलं आहे.
गुरुवारी मध्यरात्री सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या व्यक्तीची पहिली झलक समोर आली आहे. वांद्रे येथील इमारतीच्या बाराव्या मजल्यावर असलेल्या सैफच्या घरावर झालेल्या या हल्ल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे आणि या घटनेमागील हेतू सर्वांना जाणून घ्यायचा आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या प्राथमिक तपासात हा चोरीचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आता सैफवर हल्ला करणाऱ्या घुसखोराचा पहिला फोटो सीसीटीव्ही फुटेजद्वारे समोर आला. इमारतीच्या पायऱ्यांवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून या संशयिताची पहिली झलक समोर आली आहे.
View this post on Instagram
आरोपी हिस्ट्रीशीटर असल्याचा पोलिसांना संशय
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना संशय आहे ती, आरोपी हिस्ट्रीशीटर असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस आरोपीच्या गुन्हेगारीच्या रेकॉर्डची चौकशी करत आहेत. काही तासांपूर्वी प्रभादेवी परिसरात पोलिसांकडून शोध मोहीम राबवण्यात आली आहे.
हल्लेखोर इमारतींच्या पायऱ्यांवरुन घरात घुसला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्लेखोरा इमारतींच्या पायऱ्यांवरुन सैफच्या घरात घुसला आणि थेट सैफिनाच्या मुलांच्या खोलीत शिरला. तिथे मुलांचा सांभाळ करणारी नॅनी होती, तिनं त्याला पाहिलं. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तुला काय हवंय? असं तिनं विचारल्यावर त्यानं मला 1 कोटी रुपये हवे असल्याचं सांगितलं. हल्लेखोरानं सैफवरही हल्ला केला आणि त्याच्यावर सहा वेळा चाकूनं वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
पाहा व्हिडीओ : Saif Ali Khan Attack FIR | हल्लेखोराने आधी धमकावलं, सैफला केली पैशांची मागणी, FIR मध्ये नेमकं काय?
महत्त्वाच्या इतर बातम्या :