Swayamvar Mika Di Vohti: मिकाला जोडीदार शोधण्यात मदत करणार रवीना टंडन, ‘स्वयंवर’ शोमध्ये होणार अभिनेत्रीची ग्रँड एन्ट्री!
Swayamvar Mika Di Vohti: मिका सिंहसोबतच आता त्याच्या चाहत्यांनाही गायकाच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.
Swayamvar Mika Di Vohti: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक मिका सिंहचा (Mika Singh) ‘स्वयंवर: मिका दी वोटी’ (Swayamvar Mika Di Vohti) हा शो टीव्हीवर प्रसारित झाला, तेव्हापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मिका सिंहसोबतच आता त्याच्या चाहत्यांनाही गायकाच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. बॉलिवूड गायक मिका सिंह ‘स्वयंवर’ या टीव्ही शोच्या माध्यमातून स्वत:साठी जीवनसाथी शोधत आहे. या टीव्ही शोमध्ये अनेक सुंदर मुली सहभागी झाल्या आहेत, ज्या मिका सिंहला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत मिका सिंहला त्याची परफेक्ट जोडीदार शोधणे कठीण झाले आहे.
पण, आता मिका सिंहचे काम खूप सोपे होणार आहे. कारण, बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन या टीव्ही शोमध्ये एन्ट्री करणार आहे. ‘मिका दी वोटी’ या शोमध्ये रवीना टंडन सेलिब्रिटी गेस्ट म्हणून येणार असल्याचे बोलले जात आहे. एक चांगली जीवनसाथी शोधण्यात ती तिचा मित्र मिका सिंहला मदत करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, शो सुरू होण्यापूर्वी मिका सिंहने प्रोडक्शन हाऊसला सांगितले होते की, त्याला रवीना टंडनसारखी मुलगी जोडीदार म्हणून हवी आहे. या शोमधील तिच्या एन्ट्रीबाबत रवीना टंडन म्हणाली, ‘मिकाला या ठिकाणी पाहून मी खूप आनंदी झाले आहे आणि मी मिकाला अशी मुलगी शोधण्यात मदत करेन, जी त्याच्यासोबत आयुष्य घालवेल.’
पाहा प्रोमो :
यासोबत रवीना टंडनने असेही म्हटले की, ‘मी आता या शोचा एक भाग आहे याचा मला खूप आनंद आहे'. ती पुढे म्हणाली, 'मला आशा आहे की मिका आणि त्याची वोटी वेळोवेळी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतील आणि एकमेकांशी प्रेम आणि आदराने वागतील. या पुढील वाटचालीसाठी मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतेय.’
12 मुलींमधून मिका करणार एकीची निवड
‘स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची जोडीदार म्हणून निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या होत्या. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे.
हेही वाचा: