(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rang Majha Vegla : दीपिकाला कळणार अनाथ असल्याचं सत्य, दीपाला होणार अटक! ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत येणार मोठं वळण!
Rang Majha Vegla : दीपिकाला ती अनाथ असल्याचं सत्य कळणार आहे. तर, दुसरीकडे दीपिकाला किडनॅप केल्याच्या आरोपाखाली दीपाला अटक होणार आहे.
Rang Majha Vegla : ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील दीपा, कार्तिकी, कार्तिक आणि दीपिका हे चौकोनी कुटुंब लोकांकडून पसंत केलं जात आहे. सध्या मालिकेत अनेक वळणं येत आहेत. यामुळे ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. या मालिकेतील सतत बदलते ट्रॅक आणि कथेतील ट्विस्ट मालिकेची रंगत वाढवत आहेत. शिवाय यातील कलाकारांच्या अभिनयाने देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
छोट्याशा कार्तिकी आणि दीपिकाच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे. सध्या मालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. दीपिकाला ती अनाथ असल्याचं सत्य कळणार आहे. तर, दुसरीकडे दीपिकाला किडनॅप केल्याच्या आरोपाखाली दीपाला अटक होणार आहे.
दीपिकासमोर आलंय ती अनाथ असल्याचं सत्य!
श्वेता आणि आयेशा दीपिका आणि दीपा यांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. घरात काम कार्याला येणाऱ्या दीपासोबत दीपिका देखील घराबाहेर जावी, यासाठी आता त्या दोघी नवा प्लॅन बनवत आहेत. दीपिका जवळून जात असल्याचे लक्षात येताच श्वेता मुद्दाम मोठ्याने फोनवर बोलू लागते. दीपिकाला ऐकू जाईल अशा आवाजात श्वेता म्हणते, दीपिका अनाथ मुलगी आहे. तिचा डॅडा आणि आजी हे तिचे नातेवाईक नाहीत. हे ऐकून दीपिकाला धक्का बसतो.
... म्हणून दीपाला होणार अटक!
श्वेताचं बोलणं ऐकून धक्का बसलेली दीपिका रडत रस्त्यावर चालत निघून जाते. यावेळी ती कार्तिकीच्या घरी पोहचते. इथे आल्यावर ती कार्तिकीला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगते. यावेळी दीपिका देखील कार्तिकीला कार्तिकशी का बोलत नाही, यामागचं कारण सांगते. दोघींचं हे बोलणं दीपा दरवाज्यबाहेर उभं राहून ऐकते. यानंतर आत येऊन ती दोघींची समजूत काढते. मात्र, यावेळी पोलीस येतात. त्यांच्यासोबत आलेली आयेशा दीपानेच दीपिकाला पळवून नेल्याचं सांगते. यानंतर पोलीस तिला पकडून नेतात. तर, यावेळी कार्तिक दीपाविरोधातील तक्रार मागे घेण्यास नकार देतो. आता दीपा आणि कार्तिकला दीपिका त्यांचीच मुलगी असल्याचं सत्य कळणार का?, हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या
- RRR : सिनेप्रेमींसाठी खुशखबर, एसएस राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा 3D मध्ये रिलीज होणार!
- Sher Shivraj, Waghnakh : एकीकडे ‘शिवराज अष्टक’, तर दुसरीकडे ‘शिवप्रताप’! ‘शेर शिवराज’ला टक्कर देणार ‘वाघनखं’
- Ajay Devgn : 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला अजयनं दिलं उत्तर; म्हणाला...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha