RRR : सिनेप्रेमींसाठी खुशखबर, एसएस राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा 3D मध्ये रिलीज होणार!
RRR : एसएस राजामौलीचा 'आरआरआर' सिनेमा 25 मार्च रोजी रिलीज होणार आहे.
RRR : बहुचर्चित 'आरआरआर' (RRR) सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'आरआरआर' हा सिनेमा 25 मार्चला जगभरात 2D आणि 3D मध्ये रिलीज होणार आहे.
'आरआरआर' सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा डॉल्बी, आयमॅक्स आणि थ्रीडी अशा वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा भव्य दिव्य असणार आहे. सिनेमात स्पेशल इफेक्ट्स सारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे, त्यामुळे हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांना आणखी मजा येणार आहे.
View this post on Instagram
'आरआरआर' सिनेमात अजय देवगण (Ajay Devgn), आलिया भट्ट (Alia Bhatt), ज्यूनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अॅक्शनचा चांगलाच तडका असणार आहे.
संबंधित बातम्या
Amol Kolhe : पुष्पाची क्रेझ, यह टायर तो फायर निकला... डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केला वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ
Anupam Kher : 'द कश्मीर फाइल्स'नंतर अनुपम खेर यांचा नवा चित्रपट; IB 71 च्या शूटिंगला सुरूवात
Sher Shivraj, Waghnakh : एकीकडे ‘शिवराज अष्टक’, तर दुसरीकडे ‘शिवप्रताप’! ‘शेर शिवराज’ला टक्कर देणार ‘वाघनखं’
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha