(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rang Majha Vegla : आधी शिवण काम, जेवणाचे डब्बे, आता मॉडेल बनणार दीपा! पुन्हा कार्तिकचं हृदय भाळणार का?
Rang Majha Vegla : उदरनिर्वाहासाठी आणि लेकीला मोठं करण्यासाठी दीपाने पडेल ती कामं केली. शिवण काम ते लोकांना जेवणाचे डब्बे देण्याचा व्यवसाय देखील केला आहे. मात्र, आता दीपा चक्क मॉडेल बनणार आहे.
Rang Majha Vegla : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) ही मालिका आता एका नव्या वळणावर आली आहे. या मालिकेत आता दीपाचं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने सुरु होणार आहे. दीपा आता तिच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. कार्तिकपासून दुरावल्यानंतर दीपा एकटी पडली होती. या वेळी उदरनिर्वाहासाठी आणि लेकीला मोठं करण्यासाठी दीपाने पडेल ती कामं केली. शिवण काम ते लोकांना जेवणाचे डब्बे देण्याचा व्यवसाय देखील केला आहे. मात्र, आता दीपा चक्क मॉडेल बनणार आहे.
मालिकेत सौंदर्या इनामदारांची मोठी कंपनी आहे, ज्यात ब्युटी प्रॉडक्ट बनवले जातात. या कंपनीच्या उत्पादनांसाठी पहिला श्वेता मॉडेलिंग करत होती. मात्र, आता त्यांच्या बिझनेस पार्टनरने श्वेताला या जाहिरातीत काम करण्यास मनाई केली आहे. नवी संकल्पना घेऊन इनामदारांची कंपनी नवं उत्पादन लाँच करणार आहे आणि यासाठी त्यांना नवा चेहरा हवा आहे. या जाहिरातीसाठी त्यांनी दीपाला घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दीपाचं सौंदर्य पाहून कार्तिक पुन्हा भाळणार!
या जाहिरातीच्या शूटिंगसाठी दीपा एक सुंदर साडी नेसून तयार होते. दीपासोबत या जाहिरातीत कार्तिकची मुलगी दीपिका देखील झळकणार आहे. या जाहिरातीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पहिल्यासारखंच तयार झालेल्या दीपाला पाहून कार्तिक घायाळ होणार आहे. त्याला पुन्हा एकदा त्याच्या प्रेमाची जाणीव होणार आहे. या जाहिरातीच्या निमित्ताने कार्तिक आणि दीपा पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ येणार आहेत.
माझी आई अन् तुझे बाबा!
या मालिकेतील चिमुकल्या कार्तिकी आणि दीपिका प्रेक्षकांच्या पसंती उतरल्या आहेत. मालिकेत सध्या या दोघी आपलं कुटुंब एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे आईची माय आहे, तर दुसरीकडे वडिलांचं प्रेम. मात्र, या दोघींनाही आपलं कुटुंब पूर्ण करायचं आहे. अशातच आता त्यांच्या बालमनाला आता आई-बाबा शेअर करण्याची कल्पना सुचली आहे. कार्तिकी नि तिची आई, तर दीपिका आणि तिचा डॅडा मिळून त्या दोघी आपल्या छोट्याशा कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करणार आहेत. मात्र, हेच आपले खरे आई-वडील आहेत, हे कळल्यावर दोघींची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.
हेही वाचा :