(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palak Tiwari : सैफ अली खानच्या लेकासोबत दिसली पलक तिवारी, पापाराझींच्या कॅमेरासमोर लपवला चेहरा!
Palak Tiwari, Ibrahim Khan : नुकतंच पलकला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याचा मुलगा इब्राहिमसोबत (Ibrahim Ali Khan) स्पॉट करण्यात आलं. दोघेही सोबत दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं.
Palak Tiwari, Ibrahim Khan : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) हीचं नाव सध्या बरंच चर्चेत असतं. आई श्वेताप्रमाणेच पलक देखील मनोरंजन विश्वात सक्रिय झाली आहे. लवकरच तिचा बॉलिवूड चित्रपट ‘रोझी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, अभिनेत्री आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच पलकला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याचा मुलगा इब्राहिमसोबत (Ibrahim Ali Khan) स्पॉट करण्यात आलं. दोघेही सोबत दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं.
काही महिन्यांपूर्वीदेखील इब्राहिम आणि पलक एकत्र स्पॉट झाले होते. मात्र, तेव्हा ते एकाच वेळी, एकाच ठिकाणी वेगवेगळे दिसले होते. यावेळी मात्र, दोघेही एकाच गाडीतून आले अन् एकाच गाडीतून घरी गेले. यावेळी पलक तिवारीने मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून लपण्याचा खूप प्रयत्न केला होता. मुंबईतील एका प्रसिद्ध फूड जॉइंटमधून बाहेर पडताना हे दोघे स्पॉट झाले आहेत. दोघेही एकत्र दिसल्यानंतर ते डिनर डेटला गेले होते का?, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
आधीही दिस्लेय्त एकत्र
सेलिब्रिटी फोटोग्राफर विलर भयानी यांनी हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
इब्राहिमबद्दल बोलताना पलक म्हणते...
याधीही एकत्र दिसल्याने इब्राहिम आणि पलकला त्यांच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना पलक म्हणाली की, ‘आम्ही फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आम्हीच नाही तर, आमच्यासोबत आमची फ्रेंड्स गँगदेखील तिथे होती. मात्र, मीडियाला फक्त आम्ही दिसलो आणि आता चर्चेत आलो. इब्राहिम खूप चांगला मित्र आहे. तो सगळ्यांची काजळी घेतो. मात्र, ही आमची डेट नव्हती!’
पलक तिवारी ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. तर, इब्राहिम खान हा बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंह आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा आहे. पलक अभिनेत्री म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे तर, इब्राहिम खान हा अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक म्हणून काम करत आहे.
संबंधित बातम्या