Raid 2 Box Office Collection Day 19: 'रेड 2' अजय देवगणच्या करिअरची पाचवी सर्वात मोठी फिल्म, 'छावा'शी बरोबरी करणार?
Raid 2 Box Office Collection Day 19: एकीकडे लोक 'मिशन इम्पॉसिबल', 'जाट', 'केसरी 2' सारख्या चित्रपटांबद्दल बोलत राहिले, तर दुसरीकडे, अजय देवगणच्या रेड 2 या चित्रपटानं सर्वांना मागे टाकत धुवांधार कमाई केली आहे.

Raid 2 Box Office Collection Day 19: अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'रेड 2' (Raid 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) वगळला तर, यावर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व सिनेमांचे रेकॉर्ड चक्काचूर केले आहेत. या चित्रपटानं पैसे कमवतानाच बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड बनवले आहेत.
1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या 'रेड 2'ची टक्कर 'जाट', 'केसरी 2', 'रेट्रो', 'हिट 3' सारख्या चित्रपटांशी झाली. यानंतर, तिला नुकतंच प्रदर्शित झालेल्या दोन मोठ्या हॉलिवूड चित्रपटांचा सामना करावा लागत आहे. यातील पहिला चित्रपट टॉम क्रूझचा 'मिशन इम्पॉसिबल 8' आहे आणि दुसरा चित्रपट 'फायनल डेस्टिनेशन'चा सहावा भाग आहे. असं असूनही, 'रेड 2' च्या कमाईचा वेग फारसा कमी झालेला नाही. अजूनही चित्रपट धुवांधार कमाई करत आहे.
'रेड 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
'रेड 2'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या कमाईशी संबंधित 18 दिवसांचा अधिकृत डेटा जारी केला आहे. यानुसार, चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 98.89 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 41.33 कोटी रुपये आणि तिसऱ्या आठवड्यात 13.45 कोटी रुपये कमावले, असे एकूण 153.67 कोटी रुपये कमावले आहेत.
चित्रपटाच्या कमाईशी संबंधित आजचा सुरुवातीचा डेटा देखील Scnilc वर अपडेट करण्यात आला आहे, त्यानुसार चित्रपटानं सकाळी 10.20 पर्यंत 2.25 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचं एकूण कलेक्शन 155.92 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
अजय देवगणच्या 'रेड 2'नं आज आणखी एक रेकॉर्ड मोडलाय
'रेड 2'नं अजय देवगणच्या गेल्या वर्षीच्या 'शैतान' चित्रपटाच्या (149.49 कोटी रुपये) लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकलं आहे. आता आज त्यानं त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा चित्रपट 'टोटल धमाल'ला मागे टाकलं आहे. तुम्हाला सांगतो की, टोटल धमालनं 154.23 कोटी रुपयांचं लाईफटाईम कलेक्शन केलं होतं.
'रेड 2' अजय देवगणचा पाचवा सर्वात मोठा चित्रपट
यासोबतच, 'रेड 2' हा अजय देवगणच्या कारकिर्दीतील चौथा सर्वात मोठा चित्रपट बनला आहे. बॉलीवूड हंगामानं दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट तुम्ही खाली पाहू शकता.
- तान्हाजी द अनसंग वॉरियर : 279.55 कोटी रुपये
- सिंघम अगेन : 268.35 कोटी रुपये
- दृश्यम 2 : 240.54 कोटी रुपये
- गोलमाल अगेन : 205.69 कोटी रुपये
- रेड 2 : 155 कोटी रुपयांपेक्षाही जास्त (अजूनही बॉक्स ऑफिसवर आहे)
महत्त्वाच्या इतर बातम्या :























